आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले
अयोध्येत एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करत विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेचा निषेध करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी अयोध्येत घडलेल्या घटनेला लज्जास्पद म्हटलंय. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचारावर निषेध व्यक्त केला आहे.राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘तीन दिवसांपासून मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. आणखीन एका अपराधामुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अजून किती दिवस आणि किती कुटुंबियांना जाच सहन करावा लागेल आणि मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागेल?’ असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी उपस्थित केला आहे.
बहुजन विरोधी भाजप राजवटीत विशेषत: उत्तर प्रदेशात दलितांवरील घृणास्पद अत्याचार, अन्याय आणि हत्येचे प्रमाण वाढत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीने चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी. कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका. देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्यायासाठी पाहत आहे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अयोध्येत एका तरुणीवर अत्याचार करून अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडली आहे. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या प्रकाराचा घटनाक्रम सांगताना अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषेदत ढसा ढसा रडले.
अयोध्येत घडलेल्या प्रकारानंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. तरुणीला न्याय मिळाला नाही, तर राजीनामा देऊ, असा इशारा खासदार प्रसाद यांनी दिला. खासदार प्रसाद भर पत्रकार परिषदेत धाय मोकलून रडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अयोध्येत घडलेल्या प्रकारानंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. तरुणीला न्याय मिळाला नाही, तर राजीनामा देऊ, असा इशारा खासदार प्रसाद यांनी दिला. खासदार प्रसाद भर पत्रकार परिषदेत धाय मोकलून रडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘अयोध्येत दलित तरुणीसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अयोध्येत दलित तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवस तिच्या कुटुंबीयांनी मदतीची याचना केली. प्रशासनाने तिच्या कुटुंबीयाकडे मागणीकडे लक्ष दिलं असतं, तर तिचा जीव वाचला असता. देशात आणखी एका तरुणीचा अंत झाला आहे. आणखी किती कुटुंबाना जाच सहन करावा लागेल?’
राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, ‘बहुजन विरोधी भाजपच्या राज्यात विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर अत्याचार, अन्याय होत आहे. त्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलले पाहिजे. त्यांनी पीडित कुटुंबाला नेहमीप्रमाणे त्रास देऊ नये. देशातील तरुणी आणि संपूर्ण दलित समाज न्याय मागत आहे’, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.
अयोध्येत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेच्या विरोधात राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी गुरुवारी रात्री १० वाजता धार्मिक कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, तरुणी पुन्हा घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तीन दिवसांनी तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. तिचे डोळे काढले होते. हात-पाय दोरीने बांधले होते. चेहरा आणि कपाळावर गंभीर जखमा होत्या. तिच्या शरीराचे हाडे मोडली होती. तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.