Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद

पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे आत्मकथन वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. राहुल गांधींनी संसदेमध्ये त्याचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2026 | 03:23 PM
Former Army Chief Manoj Mukund Naravane' Four Stars of Destiny book controversy

Former Army Chief Manoj Mukund Naravane' Four Stars of Destiny book controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे वादाच्या भोवऱ्यात
  • फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे आत्मकथन वादात
  • राहुल गांधींनी संसदेत उल्लेख केल्याने वाद
EX – Army Chief General Naravane Book : नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लोकसभेमध्ये बोलणार होते. मात्र त्यापूर्वीच संसदेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये एका न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहेत. पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे आत्मकथन लिहिले आहे. मात्र हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नाही. याचा उल्लेख राहुल गांधींनी करताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आक्रमक भूमिका घेतली.

मनोज मुकुंद नरवणे हे माजी सेनाप्रमुख असून त्यांच्या आत्मकथनामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. नरवणे यांच्या पुस्तकामध्ये देशाच्या संवेदनशील सैन्य कारवाई आणि त्यामागील राजकीय हालचाली याबाबत उल्लेख करण्यात आल्याची शक्यता आहे. अद्याप हे पुस्तक प्रकाशनाच्या कचाट्यामध्ये अडकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पुस्तकातील काही भाग व्हायरल झाला होता. त्याचबरोबर अग्नीवीर योजनेबाबत देखील अनेक दावे करण्यात आले होते.

हे देखील वाचा : संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध

2020 साली गलवान क्षेत्रामध्ये चीनी सैनिकांकडून आक्रमण करण्यात आले होते. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी मनोज मुकुंद नरवणे हे सेनाप्रमुख होते. त्यांनी पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्री, ज्या दिवशी चीनी सैन्याने लडाखमधील रेचिन ला खिंडीतून घुसखोरी केली होती, त्या दिवशी नरवणे आणि तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या चर्चेचे वर्णन केले आहे. पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबद्दल माहिती दिली तेव्हा मोदींनी त्यांना “तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा” असे निर्देश दिले.

‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ पुस्तकावरुन वाद 

माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या कार्यकाळात, जून २०२२ मध्ये, देशात अग्निवीर योजना लागू करण्यात आली. अग्निवीर योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या ७५% तरुणांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव लष्कराने ठेवला असला तरी, सरकारने तो २५% पर्यंत कमी केला. शिवाय, या सैनिकांना फक्त २०,००० रुपये वेतन दिले जात होते, परंतु नंतर ते वाढवून ३०,००० रुपये करण्यात आले. याबाबत देखील त्यांनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये लिहिले असल्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

या पुस्तकाचा उल्लेख करुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनीच्या घुसखोरीवरुन संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले. चीनने भारताच्या हद्दीमध्ये चार तळ ठोकले असून कैलास पर्वतावर देखील आक्रमक केल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान संसदेत चीनचा आणि डोकलामचा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेमध्ये माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख केला. यामुळे लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. या प्रकरणामुळे लोकसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Web Title: Former army chief manoj mukund naravane four stars of destiny book controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Parliament News
  • Rahul Gandhi
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Political News : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा
1

Political News : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा

Chiplun News: राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’विरोधात भाजप आक्रमक; संसदेच्या अवमानाचा आरोप करत जोरदार निदर्शने
2

Chiplun News: राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’विरोधात भाजप आक्रमक; संसदेच्या अवमानाचा आरोप करत जोरदार निदर्शने

Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक; प्रतिमेला जोडे मारत केला निषेध
3

Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक; प्रतिमेला जोडे मारत केला निषेध

खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध; पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी
4

खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध; पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.