Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget Session 2026: माजी CDS मनोज नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

चिनी टँक कैलास पर्वतरांगांपासून काहीशे मीटर अंतरावर भारतीय जागांवर होते, असे सांगत राहुल गांधींनी सुरूवात करताच, एकामागून एक तीन वरिष्ठ मंत्री उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न केला...

  • By anuradha sagar
Updated On: Feb 03, 2026 | 02:59 PM
Budget Session 2026: माजी CDS मनोज नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर
Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींकडून माजी सीडीएस  मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख
  •  अमित शहा, किरेण रिजिजू आणि राजनाथ सिंह यांनी राहुल गाधींना बोलण्यापासून अडवले
  • तुम्ही सभागृहाचे नियम मोडत आहात- किरेन रिजिजू
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्याने मोठा गोंधळ उडाला. २ फेब्रुवारी २०२६ रोजी, राहुल गांधी सभागृहात देशाचे माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील विधान वाचत असताना, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांना अडवण्यासाठी उभे राहिले.

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद

राहुल गांधींच्या डोकलाम विधानावरून वाद

राहुल गांधी म्हणाले की, ‘तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस पक्षावर आरोप केले आणि आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. चिनी टँक कैलास पर्वतरांगांपासून काहीशे मीटर अंतरावर भारतीय जागांवर होते, असे सांगत राहुल गांधींनी सुरूवात करताच, एकामागून एक तीन वरिष्ठ मंत्री उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न केला…

राजनाथ सिंह: राहुल गांधींवर निशाणा साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “राष्ट्रपतींच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख नव्हता. राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत ते कधीही प्रकाशित झालेले नाही. राहुल गांधीचा संदर्भ चुकीचा आहे.

अमित शहा: अमित शहा यांनीदेखील राहुल गांधींवर आक्षेप निशाणा साधला. त्यांनी सर्वात आधी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे उघड करावे. राहुल गांधी इतर कोणाचेही लेखन वाचू शकत नाहीत.” असा दावा करत राहुल गांधींच्या पुस्तक वाचण्यावर आक्षेप घेतला.

Sunil Tatkare on NCP Merge: ‘विलीनीकरण कोणाचे आणि कोणात?’ सुनील तटकरेंचा शरद पवार गटाला रोखठोख

 

किरेन रिजिजू: रिजिजू यांनी, “तुम्ही सभागृहाचे नियम मोडत आहात. संसद नियमांनुसार चालते आणि तुम्ही येथे अप्रकाशित पुस्तकाबद्दल बोलू शकत नाही.” असं सांगत राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले.

राहुल गांधींच्या विधानावर सरकारचा आक्षेप काय ?

दरम्यान, राहुल गांधी यांनी ” नरवणे यांच्या पुस्तकात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांबद्दल लिहिण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यावर,”ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही. अप्रकाशित पुस्तक संसदेत वाचले जाऊ शकत नाही. या पुस्तकात चुकीचे युक्तिवाद आहेत. म्हणूनच पुस्तक प्रकाशित होऊ दिले नाही,पण राहुल गांधी तेच पुस्तक वाचक आहेत, जे चुकीचे आहे.” असे स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांच्याकडून करण्यात आला.

Web Title: Why was former cds mukund naravanes book not allowed to be published rajnath singh gave the answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Amit Shah
  • China
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
1

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.