'मेक इन इंडिया' एक चांगली कल्पना पण,...', PM नरेंद्र मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींनी डागली तोफ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’चा विचार चांगला होता पण त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. असं म्हणत नाही की पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण त्यांच्या प्रयत्नांना कोणतंही यश मिळाले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही उत्पादन चीनला सोपवले. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आले. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होत आहे. यावेळी राहुल गांधी बोलत होते.
राहुल म्हणाले की, उत्पादन क्षेत्रात वाढ नसल्याने देशात बेरोजगारीचं प्रमाण सातत्यांने वाढत आहे. देशात विषमता वाढत आहे. रोजगारीबाबत सरकारचं धोरण स्पष्ट नाही. AI स्वतःच निरर्थक आहे. डेटाशिवाय एआयला अर्थ काय? चीन आपल्यापेक्षा १० वर्षे पुढे आहे. जेव्हा जेव्हा आपण फोन वापरतो किंवा एखाद्या तंत्रज्ञानाविषयी बोलतो, त्यावेळी चीन आपल्यापेक्षा कितीतरी पुढे असल्याचं जाणवंत. बॅटरी, ईव्ही यासारख्या उत्पादनांमध्ये चीन पुढे आहे.
ते म्हणाले की जर आपण चिनी टी-शर्ट परिधान केला तर आपण चीनच्या उत्पादनात भर टाकतो. या देशातील सर्व तरुणांना सांगू इच्छितो की एक क्रांती होत आहे. शेवटची क्रांती झाली ती संगणक क्रांती होती. तेव्हा आमच्या सरकारने ठरवले होते की आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करू. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा म्हणाले होते की संगणकांचा भारतावर कोणताही प्रभाव नाही.
आपल्याकडे बचत आणि वापराचा डेटाही नाही. परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्ही आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत आमंत्रण पाठवत नाही. यावर किरण रिजिजू यांनी आक्षेप घेतला आणि विरोधी पक्षनेत्यांनी अशी विधाने करू नयेत असे म्हटले. हा एक गंभीर विषय आहे ज्यावर चर्चा होत आहे. राहुल गांधींनी ठोस माहिती द्यावी. यावर राहुल गांधी म्हणाले की, जयशंकर यांना तीन वेळा अमेरिकेत पाठवण्यात आलं. जर हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर मी माफी मागतो. चीनने भारतीय भूमीवर कब्जा केल्याचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी ते नाकारले परंतु लष्कराने म्हटले की चीनने ४,००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. यावर आक्षेप घेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप व्यक्त केला आणि हा एक गंभीर मुद्दा असल्याचं सांगितलं जातं. तुम्ही असे म्हणू नये, हे देशासाठी चांगले नाही. तुम्ही गंभीर असले पाहिजे. सभापतींनी राहुल गांधींना त्यांच्या विधानांच्या समर्थनार्थ तथ्ये सभागृहाच्या टेबलावर मांडण्यास सांगितले. लष्करप्रमुखांच्या विधानाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला आहे. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती अशी आहे की युद्ध हे औद्योगिक व्यवस्थेवर अवलंबून असते आणि यामध्ये ते आपल्यापेक्षा पुढे आहेत आणि हेच कारण आहे की चीन पाय रोवून बसला आहे आणि मेक इन इंडिया प्रोजेक्ट अपयशी ठरत आहे.
उत्पादन गेल्या ६० वर्षातील सर्वात कमी पातळीवर आहे. मेक इन इंडियाचा उल्लेख करत त्यांनी फोन दाखवला आणि म्हणाले की जरी आपण म्हणतो की तो भारतात बनवला आहे, तरी त्याचे भाग चीनमधून आले आहेत आणि ते येथे असेंबल केले गेले आहेत. आम्ही उपभोगावर लक्ष केंद्रित केले, असमानता वाढली. ते म्हणाले की जग पूर्णपणे बदलत आहे. आपण पेट्रोलियमपासून बॅटरी आणि अणुऊर्जेकडे वाटचाल करत आहोत. सगळं बदलत आहे. गेल्या वेळी जेव्हा क्रांती झाली तेव्हा भारत सरकारने संगणक क्रांती पाहिली होती आणि त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. संगणक आला तेव्हा लोक हसायचे. मी वाजपेयीजींचा आदर करतो पण ते याविरुद्धही बोलत असतं. युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिन बनवले जातात. त्यांनी रोबोट्सपासून ते ड्रोनपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की आज लोक एआयबद्दल बोलत आहेत. एआय डेटावर काम करतं. डेटाशिवाय हे काहीच नाही. प्रश्न असा आहे की एआय कोणता डेटा वापरत आहे. भारताकडे कोणताही डेटा नाही. एआय चीनी किंवा अमेरिकन डेटाचा वापर करेलं, असा प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला आहे.