Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार

Trump Warns India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला शुल्क आकारण्याची धमकी दिली आहे. भारतातून रशियन तेलाच्या वाढत्या आयातीदरम्यान, ट्रम्प म्हणाले, "त्यांना मला खूश करणे महत्वाचे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 05, 2026 | 09:53 AM
trump Warns modi on russian oil tariff threat india us trade war 2026

trump Warns modi on russian oil tariff threat india us trade war 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियाकडून तेल आयात सुरूच राहिल्यास भारतावर पुन्हा एकदा कठोर व्यापारी शुल्क (Tariffs) लादण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
  •  ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना “खूप चांगले व्यक्ती” म्हटले असले, तरी भारताने मला खूश करणे आणि व्यापार संतुलित करणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
  •  नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताची रशियन तेल आयात ६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली असून एकूण आयातीत रशियाचा वाटा ३५% इतका झाला आहे.

Donald Trump India tariffs 2026 : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध पुन्हा एकदा तणावाच्या वळणावर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीवरून भारताला थेट इशारा दिला आहे. “पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहेत, पण रशियासोबतचा व्यापार मला मुळीच आवडलेला नाही. भारताने मला खूश करणे गरजेचे आहे, अन्यथा आम्ही लवकरच टॅरिफ वाढवू,” अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“मोदींना ठाऊक आहे मी नाराज आहे” – ट्रम्प

एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापारावर भाष्य केले. ते म्हणाले, “त्यांना (भारताला) मला खूश करायचे होते. पंतप्रधान मोदी खरोखरच खूप चांगले माणूस आहेत. पण त्यांना हेदेखील माहित आहे की रशियन तेलाच्या खरेदीमुळे मी खुश नाही. जर त्यांनी असाच व्यापार सुरू ठेवला, तर आम्ही त्यांच्यावर खूप वेगाने टॅरिफ (शुल्क) वाढवू शकतो.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक बाजारात आणि भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

रशियन तेलाचा उच्चांक आणि अमेरिकेची चिंता

ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने रशियाकडून तब्बल ७.७ दशलक्ष टन तेल आयात केले. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी हा वाटा ३५.१% इतका मोठा आहे. मे २०२५ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. मात्र, अमेरिकेने याला ‘रशियाच्या युद्धखर्चाला मदत’ असे संबोधत आधीच ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय वस्तूंवरील टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढवले आहेत.

#BREAKING: US President Donald Trump has warned of fresh Tariffs on India over oil trade with Russia: “PM Modi is a very good man. He’s a good guy. He knew I was not happy. It was important to make me happy. They do trade, and we can raise tariffs on them very quickly”. pic.twitter.com/v6ZpY8Wjsq — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 5, 2026

credit : social media and Twitter

भारताचा समतोल: रशियासोबत अमेरिकाही प्रबळ

अमेरिका जरी दबाव टाकत असली, तरी भारताने आपले धोरण संतुलित ठेवले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने अमेरिकेकडूनही मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. अमेरिकन तेलाचा वाटा मागील महिन्याच्या ४.२% वरून थेट १२.६% वर पोहोचला आहे. भारताने अमेरिकेकडून सुमारे २.८ दशलक्ष टन तेल खरेदी करून आपला व्यापार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, रशियन तेलाची मोठी खरेदी ट्रम्प प्रशासनासाठी अद्यापही डोकेदुखी ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

व्यापार करार रखडला?

भारत आणि अमेरिका यांच्यात एका मोठ्या व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र, रशियन तेल आणि कृषी उत्पादनांवरील शुल्कामुळे ही चर्चा सध्या अडखळली आहे. वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत रशियावरील अवलंबित्व कमी करण्यास तयार असला तरी अमेरिकेने लादलेले टॅरिफ मागे घ्यावेत अशी भारताची मागणी आहे. मार्च २०२६ पर्यंत हा करार पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी ट्रम्प यांच्या ताज्या धमकीमुळे यात अडथळे येऊ शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफची धमकी का दिली?

    Ans: भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे सुरू ठेवल्यामुळे ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. रशियन तेल आयातीमुळे रशियाला युद्ध निधी मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

  • Que: सध्या भारतीय वस्तूंवर अमेरिकेत किती टॅरिफ आहे?

    Ans: ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने रशियन तेल खरेदीचा दंड म्हणून अनेक भारतीय वस्तूंवरील टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढवले आहेत.

  • Que: नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने रशियाकडून किती तेल आयात केले?

    Ans: भारताने नोव्हेंबर २०२५ मध्ये रशियाकडून ७.७ दशलक्ष टन (३.७ अब्ज डॉलर मूल्य) तेल आयात केले, जे एकूण आयातीच्या ३५.१% आहे.

Web Title: Trump warns modi on russian oil tariff threat india us trade war 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Donald Trump
  • International Political news
  • PM Narendra Modi
  • Tarrif

संबंधित बातम्या

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय
1

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय

Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात
2

Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?
3

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
4

Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.