रेल्वेच्या आरक्षणाचा नवा नियम (फोटो सौजन्य - iStock)
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमानुसार, ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधारशी जोडलेले आहे तेच सामान्य कोट्याचे तिकीट बुकिंग उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतील.
काही महिन्यांपूर्वीच IRCTC ने आधार कार्ड जोडले नसल्यास तात्काळ आरक्षण करण्यात येणार नाही सांगितले होते आणि आता त्यामध्ये अजून एक नवा नियम जोडण्यात आलाय. नक्की हा नियम का आहे आणि कसा आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
नवीन नियम काय म्हणतो?
फक्त आधारशी जोडलेले वापरकर्ते पहिल्या १५ मिनिटांसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात अर्थात ज्या प्रवाशांचे खाते आधारशी जोडलेले आहे तेच सामान्य आरक्षण उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतील.
याशिवाय रेल्वे एजंट किंवा दलाल पहिल्या १५ मिनिटांत कोणतेही ई-तिकिटे बुक करू शकणार नाहीत, ज्यामुळे तिकिटांची साठेबाजी आणि बेकायदेशीर बुकिंगला आळा बसेल. यासाठी हा खास नियम करण्यात आलाय. तसंच पीआरएस काउंटरवर कोणताही बदल नाही. सामान्य काउंटरवरून तिकीट बुकिंगची प्रक्रिया जशी आहे तशीच सुरू राहील आणि तेथे वेळेत किंवा नियमात कोणताही बदल होणार नाही.
या बदलामागील उद्देश
रेल्वे बोर्डाने हा बदल अशा एजंट आणि दलालांविरुद्ध एक कठोर पाऊल मानला आहे जे मोठ्या प्रमाणात तिकिटे खरेदी करून सामान्य प्रवाशांना तिकीट मिळविण्यात अडचणी निर्माण करतात. आधार लिंकिंगमुळे तिकीट बुकिंग खऱ्या आणि कायदेशीर प्रवाशाकडूनच होत आहे याची खात्री होईल, ज्यामुळे तिकीट प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष होईल.
IRCTC च्या तात्काळ बुकिंसाठी आता आधार गरजेचे, प्लॅटफॉर्म काऊंटरवरून कसे मिळणार? रेल्वेने बदलला नियम
तांत्रिक प्रणाली आणि जागरूकता
नवीन नियमाचे अचूक पालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने CRIS आणि IRCTC ला त्यांच्या प्रणालींमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व विभागीय रेल्वेंनाही या बदलाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रचार मोहिमा राबवल्या जातील, जेणेकरून प्रवाशांना या नवीन प्रणालीची ओळख होऊ शकेल.
प्रवाशांसाठी फायदे
या नवीन नियमामुळे प्रवाशांना अनेक प्रकारे फायदा होईल. तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल. तिकिटांची साठवणूक आणि बुकिंग एजंटकडून होणाऱ्या समस्या कमी होतील. खऱ्या प्रवाशांना आरक्षणात प्राधान्य मिळेल. ई-तिकीटिंग प्रणालीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढेल.