आता तात्काळ तिकीट काढण्यासाठी रेल्वेचा १ जुलैपासून नवा नियम (फोटो सौजन्य - iStock)
भारतीय रेल्वे अनेक मोठ्या बदलांकडे वाटचाल करत आहे. रेल्वेने तिकिटे बुक करण्याचे नियम बदलले आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून रेल्वे भाडे वाढवता येऊ शकते. १ जुलैपासून तात्काळ तिकिटांसाठी आधार अनिवार्य करण्यात आला आहे, आधार लिंक्ड IRCTC अकाउंटशिवाय तत्काळ तिकिटांचे बुकिंग करता येणार नाही.
तथापि, भारतीय रेल्वे आयआरसीटीसी अकाउंटवरून तत्काळ तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी एक नवीन नियम आणू शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आधार कार्ड व्यतिरिक्त, रेल्वे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदार ओळखपत्र यासारख्या इतर ओळखपत्रांचा वापर करण्यास परवानगी देऊ शकते. तथापि, अटी अशा असतील की ही कागदपत्रे अपलोड करून डिजीलॉकरमध्ये सेव्ह करावीत. सोमवारी याबाबत अपडेट जारी केले जाऊ शकते असे मानले जात आहे (फोटो सौजन्य – iStock)
1 जुलैपासून नियम बदल
ऑनलाइन तात्काळ तिकिटांची प्रणाली अर्थात सिस्टिम बदलणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंग दरम्यान होणारी फसवणूक रोखण्यासाठी, रेल्वेने १ जुलैपासून बुकिंग नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, जर तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही तिकिटे बुक करू शकणार नाही. अनेक लोकांचा असा प्रश्न आहे की जर त्यांनी स्टेशनवरील तिकिट काउंटरवरून तत्काळ तिकिटे खरेदी केली तर काय होईल? याबाबतदेखील तुम्हाला माहिती आम्ही या लेखातून देत आहोत.
Indian Railway : आता 1 जुलैपासून रेल्वेचा प्रवास महागणार! कशी असेल नवी भाडेवाढ? जाणून घ्या
काऊंटरवरील तात्काळ तिकिटांचा नियम
या नवीन बदलामुळे केवळ ऑनलाइन तिकीट बुकिंगच नाही तर एजंटद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांवरही परिणाम होईल असेही सांगण्यात येत आहे. आता रेल्वे काउंटरवरून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी एक नवीन नियम आहे. १५ जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, तुम्हाला रेल्वे काउंटरवरून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी ओटीपी द्यावा लागेल.
ओटीपी प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ तिकिटे बुक केली जाणार नाहीत. म्हणजेच, १५ जुलैपासून, जेव्हा तुम्ही तिकीट काउंटरवर तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी जाल तेव्हा बुकिंग दरम्यान तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल, जो फीड केल्यानंतरच बुक केला जाईल.
एजंटना ‘धक्का’
तिकीट एजंटसाठी हा नवीन नियम धक्कादायक आहे. तिकीट एजंटसाठी तात्काळ तिकीट खिडकी बुकिंग उघडल्यानंतर ३० मिनिटांनी सक्रिय होईल. म्हणजेच, सकाळी १०.०० वाजता उघडणारी एसी क्लासमध्ये तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी बुकिंग विंडो एजंटसाठी सकाळी १०.३० वाजता उघडेल. सकाळी ११.०० वाजता उघडणारी नॉन-एसी क्लाससाठी बुकिंग विंडो एजंटसाठी सकाळी ११.३० वाजता उघडेल. त्यामुळे आता तिकिट बुकिंसाठी एजंटना अधिक काळ थांबावे लागणार आहे.