रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
सण-उत्सवांकरिता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सण-उत्सवांच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी आणि तिकिटांसाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन योजना आणली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राऊंड ट्रिप पॅकेज’ची घोषणा केली आहे.
Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार
या योजनेअंतर्गत कोणताही प्रवासी येण्याचे आणि जाण्याचे तिकीट एकाचवेळी बुक करत असेल, तर परतीच्या प्रवासासाठीच्या मूळ किमतीवर त्या प्रवाशाला तब्बल २० टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्याचे आणि जाण्याचे तिकीट एकाच नावाने आणि सर्व माहितीसह बुक करतील. दोन्ही तिकीटे एकाच क्लासची आणि एकाच स्टेशनपासून तसेच एकाच स्टेशनपर्यंतची असली पाहिजे. प्रवाशांना या योजनेचा लाभघेण्यासाठी जाण्याचे तिकीट आधी बुक करावे लागेल. त्यानंतर ‘कनेक्टिंग जर्नी फीचर द्वारे येण्याचे सर्व गाड्यांना योजना लागू ही योजना सर्व क्लास आणि सर्व ट्रेन्सना लागू आहे. यात स्पेशल ट्रेन्सचाही समावेश आहे. मात्र, ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या ट्रेन्समध्ये ही सुविधा उपलब्ध नसणार आहे. दोन्ही तिकीटे एकाच माध्यमातून म्हणजेच ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवर जाऊन बुक करावी लागतील.
म्हणजे परतीचे तिकीट बुक करावे लागेल. परतीचे तिकीट बुक करताना ‘अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड’ (ARP) नियम लागू होणार नाही. परंतु अट एकच आहे की, दोन्ही बाजूंची तिकीटे कन्फर्म असली पाहिजे. एकदा तिकीट बुक झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. तसेच ‘रिफंड’ची सुविधाही मिळणार नाही. याशिवाय परतीचे तिकीट बुक करताना अन्य कोणतीही सवलत, व्हाउचर, पास किंवा रेल्वे ट्रॅव्हल कूपन लागू होणार नाही.
पुलाचे कठडे तोडून अवजड ट्रक पुलावरच लटकला; महामार्गावरील वाहतूक ठप्प
प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवणार
प्रायोगिक पातळीवर रेल्वेकडून ही योजना सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. अनेकजण घराबाहेर पडतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने राऊंड ट्रीप योजना आणली आहे. गर्दी टाळण्यासाठी, तिकिटांचे आरक्षण सुलभ करणे, प्रवाशांना सुविधा देणे, सणासुदीच्या काळात गर्दीचे समान वितरण करणे आणि विशेष रेल्वेसह रेल्वेच्या दोन्ही दिशांनी वापर सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने ही योजना आणली आहे.