कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
गुरुग्राम : हरियाणा विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यातच चित्रपट अभिनेते व काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा कधीही विचार केलेला नाही. मला कोणीही विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफरही देणार नाही. आपला कोणताही गट नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज बब्बर यांनी गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यामध्ये प्रतिस्पर्धी राव इंद्रजित सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. आता हरियाणात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच राज बब्बर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक, राज बब्बर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांना कडवं आव्हान दिलं होतं. निवडणुकीत पराभव झाला असला तरी येथील जनतेची सेवा करत राहणार असल्याचे ते म्हणाले होते.
दरम्यान, आता ते विधानसभा निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, खुद्द राज बब्बर यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी अजून विचार केलेला नाही आणि विधानसभा निवडणूक लढवली नाही. मला कोणीही विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देणार नाही.
26 वर्षांपासून राजकारणात सक्रिय
राज बब्बर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा कधीही विचार केला नाही. त्यांना कोणीही विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देणार नाही. आपण 26 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहोत. मात्र, निवडणूक लढवण्याची इच्छा कधीच झाली नाही.