राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या संदर्भात मोठ विधान केलं. अशोक गेहलोत यांनी दावा केला की 2020 मध्ये काही काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीदरम्यान वसुंधरा राजे आणि भाजप नेते कैलाश मेघवाल ( BJP) यांनी त्यांचे सरकार वाचवले होते. गेहलोत यांच्या या दाव्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर, वसुंधरा राजे यांनी हा दावा फेटाळला असून, अशोक गेहलोत 2023 मध्ये पराभवाच्या भीतीने खोटे बोलत आहेत. गेहलोत यांचे हे षडयंत्र आहे. असं म्हणाल्याआह
खरं तर, जुलै 2020 मध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 18 काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केली होती. महिनाभर सुरू असलेले हे राजकीय नाट्य पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर संपुष्टात आले. यानंतर पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.
अशोक गेहलोत धौलपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गेहलोत म्हणाले, “जेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी राज्यातील भैरोसिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.” तसेच 2020 च्या बंडाच्या वेळी वसुंधरा राजे आणि मेघवाल म्हणाले होते की, राजस्थानमध्ये निवडून आलेले सरकार पाडण्याची परंपरा नाही.
राजस्थान की पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, शोभा रानी और कैलाश मेघवाल को पता था कि उनकी पार्टी के लोग सरकार गिरा रहे हैं। वसुंधरा राजे सिंधिया और कैलाश मेघवाल ने कहा था हमारी कभी परंपरा नहीं रही है कि चुनी हुई सरकार को हम पैसे के बल पर गिराए। इन्होंने सरकार गिराने वालों… pic.twitter.com/4XV7qs5EUl
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2023
अशोक गेहलोत यांच्या वक्तव्यावर वसुंधरा राजे यांनी पलटवार केला. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत खोटे बोलत आहेत. गेहलोत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केले, ज्यांचा प्रामाणिकपणा आणि सत्यता सर्वश्रुत आहे. असंही त्या म्हणाल्या.
मेरे खिलाफ अशोक गहलोत का बयान एक साजिश है। अशोक गहलोत ने जितना अपमान किया है, उतना कोई मेरा अपमान नहीं कर सकता। वह 2023 के विधानसभा चुनाव हारने के डर से झूठ बोल रहे है। उन्होंने इस तरह के झूठे आरोप लगाए क्योंकि वह अपनी ही पार्टी में बगावत से बौखलाए हुए हैं: राजस्थान के… pic.twitter.com/AMGXIn1bIq
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2023