Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या सभागृहाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय टोलेबाजी, शाब्दिक चकमकी आणि कोपरखळ्यांनी वातावरण चांगलेच रंगले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 12:24 PM
महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या सभागृहाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय टोलेबाजी, शाब्दिक चकमकी आणि कोपरखळ्यांनी वातावरण चांगलेच रंगले होते. जास्त बोलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या टोलेबाजीमुळे सभागृहात अनेकदा हास्यकल्लोळ उसळला, तर काही प्रसंगी सभागृहाचे संकेत पायदळी तुडवले गेल्याचीही चर्चा रंगली.

 

माजी महापौर राहुल जाधव यांनी बोलताना २०१७ आणि २०२६ मध्ये भाजपला ‘घड्याळा’ची मदत घ्यावी लागली नसल्याचे नमूद करत, “सभागृहात जास्त बोलणारे नगरसेवक माजी होतात,” अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत जाधव हे मूळचे भाजपचे नसून मनसेतून आले असल्याची आठवण करून दिली. २०१७ मध्ये आपण स्वीकृत नगरसेवक होतो, तसेच सभागृहनेते प्रशांत शितोळे यांनी अधिक वेळ बोलूनही चौथी टर्म पूर्ण केल्याचे सांगत जाधव यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.

सभागृहात हशा पिकला

“शितोळेंना सभागृहनेतेपद का दिले?” असा सवाल उपस्थित करत भोईर यांनी पुन्हा एक कोपरखळी मारली. यावर सभागृहात पुन्हा हशा पिकला. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक नितीन काळजे प्रभागातील प्रश्न मांडत असताना सभागृहनेते शितोळे यांनी आवरते घेण्याची सूचना केली. “महापौरांनी सांगितल्यावरच थांबेन,” असे काळजे म्हणाल्याने काही काळ वातावरण तापले.

हे सुद्धा वाचा : २३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

राजकीय चुरस अन् नवख्या सदस्यांची उत्सुकता

नव्याने निवडून आलेल्या सुमारे निम्म्या नगरसेवकांनी सभागृहाचे संकेत न पाळल्याचे चित्र दिसले. महापौरांना नमस्कार न करताच काही सदस्यांची ये-जा सुरू होती. तसेच विश्वजित बारणे आणि रविना अंगोळकर यांनी इंग्रजीत भाषण करून सभागृहाचे लक्ष वेधले. पहिल्याच सभेत राजकीय चुरस आणि नवख्या सदस्यांची उत्सुकता यांचा संगम पाहायला मिळाला.

विषय समित्यांवर सदस्यांची निवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. “महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नव्याने निवड झालेले सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील,” असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: The political atmosphere was heated at the first general meeting of the pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • BJP
  • PCMC Politics
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला
2

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश
3

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश

२०२९ ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग
4

२०२९ ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.