२०१४ नंतर पहिल्यांदाच संरक्षण मंत्र्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा (Photo Credit- X)
Rajnath Singh Australia Visit: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ९ आणि १० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. या भेटीला विशेष महत्त्व आहे, कारण २०१४ नंतर भारतीय संरक्षण मंत्री ऑस्ट्रेलियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया विस्तृत धोरणात्मक भागीदारी (CSP) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देणार आहे.
या भेटीदरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन महत्त्वाचे संरक्षण करार करतील. या करारांचा उद्देश द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरतेला हातभार लावणे आहे.
कराराचे प्रमुख तीन मुद्दे:
India’s Defence Minister Rajnath Singh to visit Australia on Oct 9-10, 2025, at the invite of DPM Richard Marles. Focus: Boosting strategic partnership, signing 3 key defence & maritime agreements, and deepening security ties. A step up for Indo-Aus relations! #IndiaAustralia… pic.twitter.com/68PQcqjDtQ — Polito Wire (@PolitoWires) October 6, 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा या भेटीमागे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे, हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. २००९ मध्ये सुरू झालेली धोरणात्मक भागीदारी आता संरक्षण, व्यापार आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अधिक दृढ झाली आहे.