
jeffrey epstein files mira nair elon musk name revealed 3 million documents public 2026
Jeffrey Epstein files latest news 2026 : जगाला हादरवून सोडणाऱ्या जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) लैंगिक तस्करी प्रकरणाने आता एक नवीन आणि धक्कादायक वळण घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (Department of Justice) या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा सार्वजनिक केला आहे. यामध्ये ३० लाखांहून अधिक कागदपत्रे, लाखो छायाचित्रे आणि हजारो व्हिडिओंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या नव्या कागदपत्रांमध्ये भारतीय वंशाच्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांच्यासह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या फायलींनुसार, २००९ मध्ये मीरा नायर यांच्या ‘अमेलिया’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर एक ‘आफ्टर-पार्टी’ आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी कुख्यात घिसलेन मॅक्सवेलच्या न्यू यॉर्कमधील घरी झाली होती. हॉलिवूड प्रचारक पेगी सिगल यांनी एपस्टाईनला पाठवलेल्या ईमेलमध्ये या पार्टीचा उल्लेख आहे. या पार्टीला माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मीरा नायर उपस्थित होत्या. कागदपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, मीरा नायर यांची उपस्थिती केवळ एका सामाजिक कार्यक्रमापुरती (Social Event) मर्यादित होती आणि त्यांच्यावर कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा आरोप नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
नव्याने समोर आलेल्या माहितीमध्ये टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांचाही उल्लेख आहे. नोव्हेंबर २०१२ मधील एका ईमेलमध्ये एपस्टाईनने मस्क यांना त्यांच्या खासगी बेटावर (Little St. James Island) येण्याबाबत विचारणा केली होती. यावर मस्क यांनी “बेटावर सर्वात मोठी पार्टी कधी आहे?” असा प्रश्न विचारल्याचे कागदपत्रात नमूद आहे. मस्क यांनी यापूर्वी एपस्टाईनशी कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, या ईमेल्समुळे पुन्हा एकदा जुन्या चर्चांना उधाण आले आहे.
BREAKING: DOJ Releases Over 3 Million New Jeffrey Epstein Files — Including 180,000 Images, 2,000 Videos, and References to High-Profile Names Like Elon Musk appears in latest Epstein files. He previously denied any involvement with the p*dophile Details emerging:
• Disturbing… pic.twitter.com/qi3gONkRtA — i Expose Racists & Pedos (@SeeRacists) January 30, 2026
credit – social media and Twitter
अमेरिकेचे डेप्युटी अॅटर्नी जनरल ब्लँचे यांनी सांगितले की, पारदर्शकता वाढवण्यासाठी हा सर्व डेटा सार्वजनिक केला जात आहे. यामध्ये केवळ कागदपत्रेच नाहीत, तर २,००० पेक्षा जास्त व्हिडिओ आणि १.८ लाख छायाचित्रे आहेत. हे सर्व पुरावे साक्षीदारांचे जबाब, ईमेल पत्रव्यवहार आणि अंतर्गत तपासाचा भाग आहेत. एपस्टाईनच्या नेटवर्कमध्ये राजकारण, मनोरंजन आणि कॉर्पोरेट जगतातील किती प्रभावशाली लोक सामील होते, याचा उलगडा यातून होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Nuclear Secret: इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं; अमेरिकेची झोप उडवणारा सॅटेलाईट फोटो आला समोर
न्याय विभागाने स्पष्ट केले आहे की, या फायलींमध्ये आलेली सर्व नावे गुन्हेगार नाहीत. अनेक नावे केवळ संदर्भ म्हणून किंवा सामाजिक भेटीगाठींच्या संदर्भात आली आहेत. तथापि, एपस्टाईन आणि मॅक्सवेल यांच्या काळ्या साम्राज्यात कोणाचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि कोण केवळ पाहुणे म्हणून उपस्थित होते, याचा छडा लावण्यासाठी ही ३० लाख पाने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
Ans: २००९ मध्ये घिसलेन मॅक्सवेलच्या घरी झालेल्या 'अमेलिया' चित्रपटाच्या आफ्टर-पार्टीमध्ये त्या उपस्थित होत्या, असा उल्लेख एका ईमेलमध्ये आहे.
Ans: २०१२ मधील ईमेलनुसार मस्क यांनी एपस्टाईनला त्याच्या बेटावरील पार्टीबद्दल विचारले होते, मात्र यात कोणत्याही गुन्ह्याचा उल्लेख नाही.
Ans: ३० लाखांहून अधिक पाने, २,००० व्हिडिओ आणि १.८ लाख छायाचित्रे यात समाविष्ट आहेत.