Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajyasabha Electiion 2026: 26 बिनविरोध…; आता राज्यसभेच्या ‘या’ ११ जागांसाठी होणार निवडणूक

महाराष्ट्रातील सात जागांसाठी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामदास वडकुते हे निवडणूक लढवत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 10, 2026 | 02:02 PM
राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच 'मॅजिक फिगर'च्या जवळ

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच 'मॅजिक फिगर'च्या जवळ

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नितीन नबीन रिंगणात
  • सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष बीजेडीमध्ये चुरस
  • तेलंगणातून काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांचाही समावेश
Rajyasabha Electiion 2026: राज्यसभा निवडणुकीच्या १० राज्यांतील ३७ जागांपैकी २६ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सातही उमेदवारांचा समावेश असून, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. उर्वरित ११ जागांसाठी आता १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. बिनविरोध निवड झालेल्या नेत्याला कोणताही विरोध नव्हता.

येत्या १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी बिहारमधील ५, ओडिसामधील ४ आणि हरियाणायातील २ जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचीही राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता आहे. बिगारमधील ५ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपचे शिवेश कुमार यांच्या विरोधात एडी सिंह यांच्यात लढत होणार आहे.

LPG Gas Shortage : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू

महाराष्ट्राशिवाय तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), तेलंगणा (२), छत्तीसगड (२) आणि आसाम (३) मधील उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक मनु सिंघवी (तेलंगणा) आणि एम. थंबीदुराई (तामिळनाडू) यांचा समावेश आहे.

या ११ जागांसाठी होणार मतदान:
उर्वरित ११ जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये बिहार (५ जागा), ओडिशा (४ जागा) आणि हरियाणा (२ जागा) यांचा समावेश आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नितीन नबीन रिंगणात असल्याने तेथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त विरोधकांच्या निशाण्यावर; ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

राज्यसभेत कोणते नेते बिनविरोध जातील ?

महाराष्ट्रातील सात जागांसाठी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामदास वडकुते हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून ज्योती वाघमारे हे देखील निवडणूक लढवत आहेत. विरोधी राष्ट्रवादी (सपा) कडून शरद पवार देखील निवडणूक लढवत आहेत. राज्यसभेचे सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून येतील. तामिळनाडूमधील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

टी. शिवा आणि सी. रवींद्रन हे द्रमुक कडून निवडणूक लढवत आहेत, तर एम. क्रिस्टोफर टिळक हे काँग्रेस कडून, अंबुमणी रामदास हे पीएमके कडून आणि एल.के. सुधीश हे डीएमडीके कडून निवडणूक लढवत आहेत. एम. थंबीदुराई हे एआयएडीएमके कडून निवडणूक लढवत आहेत. सर्व सहा राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.

 

 

Web Title: Rajyasabha election 2026 26 unopposed now elections will be held for these 11 rajya sabha seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • rajya sabha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.