काँग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अविश्वास प्रस्ताव करण्याचा प्रयत्न सुरु (फोटो - सोशल मीडिया)
काँग्रेस आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही असाच एक प्रस्ताव आणण्याची योजना आखत आहे. सोमवारी विरोधी पक्षांच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओम बिरला यांच्या अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागल्यानंतर, विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. जर विरोधी पक्ष संसदेत महाभियोगाची सूचना देत असेल, तर देशातील पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाईल.
हे देखील वाचा : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपचा दणाणून विजय झाला असून काँग्रेसला मोठा फटका बसला. यावेळी ईव्हीएमचा चुकीचा वापर झाला असून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरु केला आहे.
हिंदूस्तानच्या रिपोर्टनुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, एसआयआरच्या निषेधार्थ ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध हा प्रस्ताव मांडला जाईल. “इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी देखील याविषयी चर्चा झाली आहे आणि विविध राज्यांमध्ये मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणांबाबत कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यास सर्व पक्ष तयार आहेत,” असे ते म्हणाले. “हे आलटून पालटून होईल. बिर्ला यांच्याविरुद्धच्या सूचनेवर मंगळवारी विचार केला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे काँग्रेस नेते म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : राष्ट्रपती उभ्या आणि पंतप्रधान बसलेले? व्हायरल फोटोवर भाजपने मांडली खरी बाजू; पाहा काय आहे सत्य






