
Ayodhya Ram Mandir, Pawan Khera, Congress VS BJP, RSS Accountability
Ram Mandir Donation Scam: अयोध्या येथील राम मंदिरात दान चोरीच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राज्य सरकारने या संदर्भात कारवाई केली असली तरी विरोधी पक्ष यासंदर्भात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. राम मंदिराचे महासचिव चंपत राय आणि त्यांचे सहकारी अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस कडून सातत्याने केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेवर सडकून टिका केली आहे.
राम मंदिरातील दान चोरीसाठी एक विशिष्ट पदद्धत वापरली गेली. धार्मिक स्थळांवरील चोरीची एक विशिष्ट पद्धत समोर आली आहे. भाजप आणि आरएसएस त्याचा गैरफायदा घेत आहे. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले आहेत.
पवन खेरा म्हणाले, “या सर्व प्रार्थनास्थळांमधील चोरीच्या वाढत्या घटना एका विशिष्ट पद्धतीकडे निर्देश करतात. ही पद्धत अशी आहे की, भाजप आणि आरएसएससाठी धर्म हे केवळ राजकीय सत्ता मिळवण्याचे आणि स्वतःला व आपल्या जवळच्या लोकांनाच श्रीमंत करण्याचे एक माध्यम बनल्या आहेत. तसेच, ‘आम्ही आरएसएसला पुन्हा विचारू इच्छितो, यासाठीच तुम्ही तुमच्या संघटनेची नोंदणी करत नाहीत आहात का, तुम्हाला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही का, तुम्हाला तुमच्या हिशोबाची पुस्तके सार्वजनिक करायची नाहीत, हेच यामागचे कारण आहे का, असा खडा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते अयोध्येतील राम मंदिराला भेट देतील का, असे विचारले असता पवन खेरा म्हणाले, “याने काय फायदा होणार? आमच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीच राम मंदिराला अनेकदा भेट दिली आहे. त्यापैकी काहींनी देणगीही दिली आहे. अयोध्या मंदिर ट्रस्टमधील सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी याने कशी मदत होईल? याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. याचा इतर कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी काहीही संबंध नाही. हा भाजप आणि आरएसएसचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात लूटमार आहे. या प्रकल्पात कोण ही जबाबदारी घेणार नाही,”असा आरोपही पवन खेरा यांनी केला आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी मंदिर दान चोरीच्या वादावर प्रतिक्रीया दिली आहे. मंदिराला मिळणाऱ्या दान मोजणीत आपला कोणताही सहभाग नाही. दान मोजणीची प्रक्रिया स्थानिक विश्वस्तांच्या देखरेखीखाली पार पडायची.” असं गोविंद देव गिरी यांनी म्हटलं आहे. म मंदिर ट्रस्टच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या एक दिवस आधी त्यांनी प्रतिक्रीया दिल्याने त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.