Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे

Delhi Car Blast News: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या लाल फोर्ड इकोस्पोर्ट कारचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमा चौक्यांवर अलर्ट जारी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2025 | 06:43 PM
उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे

उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात एक महत्त्वाचा पुरावा
  • लाल रंगाची इको स्पोर्ट्स कार जप्त
  • या कारला फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली
Delhi Car Blast News In Marathi: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोटातील सूत्रधार डॉ. मोहम्मद उमरशी संबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. याचदरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात एक महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. फरीदाबादमधील खंडावली गावाजवळ पोलिसांनी एक संशयास्पद लाल रंगाची इको स्पोर्ट्स कार (DL 10 CK 0458) जप्त केली आहे. फरीदाबाद पोलिसांनी या कारला ताब्यात घेतले आहे आणि ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जात आहे. तपास यंत्रणा कारच्या मालकाचा आणि संभाव्य संशयितांचा शोध घेत आहेत.

Delhi Blast: भयानक! 6 जिल्ह्यातील 12 ठिकाणी फिरला होता दिल्ली ब्लास्ट कारमधील डॉ. उमर, एजन्सीला बसला धक्का

फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली स्फोट प्रकरणात संशयित असलेली लाल फोर्ड इकोस्पोर्ट कार, DL10CK0458 जप्त केली आहे. ही कार खंडावली गावाजवळ पार्क केलेली आढळली. ही कार उमर उन नबी उर्फ ​​उमर मोहम्मद याच्या नावाने नोंदणीकृत आहे आणि खरेदीच्या वेळी त्याने बनावट पत्ता दिला होता. ही कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.ही तीच कार आहे ज्याच्या नावावर दिल्ली पोलिसांनी अलर्ट जारी केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

कारला ताब्यात घेण्यात आले आहे आणि सध्या ती जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि इतर केंद्रीय एजन्सींना माहिती देण्यात आली आहे. ही कार २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीतील राजौरी गार्डन आरटीओमध्ये नोंदणीकृत होती. तपासात असे दिसून आले आहे की ही कार उमर उन नबी उर्फ ​​उमर मोहम्मद याच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. उमर हा दिल्ली बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयितांपैकी एक आहे.

फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली

पोलिसांच्या मते, उमर मोहम्मदने कार खरेदी करताना बनावट पत्ता वापरला होता. कागदपत्रांवर त्याने ईशान्य दिल्लीतील एका घराचा पत्ता दिला होता. दिल्ली पोलिसांनी काल रात्री उशिरा त्याच पत्त्यावर छापा टाकला, परंतु तेथे कोणीही सापडले नाही. तपास यंत्रणा आता खंडावली गावात कार कोणी आणि कधी सोडली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्ली पोलिसांचा फरिदाबादमध्ये अलर्ट आणि रिकव्हरी

मंगळवारी दिल्ली पोलिसांनी या लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारबाबत अलर्ट जारी केला. बॉम्बस्फोटाच्या दिवशी संशयितांसोबत ही कार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पाच पोलिस पथकांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला. फरिदाबाद पोलिसांनी कारवाई करत खंडावली गावाजवळ पार्क केलेली कार ताब्यात घेतली. आता वाहन जप्त करण्याची आणि फॉरेन्सिक तपासणी करण्याची तयारी सुरू आहे.

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेल्या Hyundai i20 च्या मालकाने केल्या ‘या’ चुका, तुम्ही असे काही करू नका!

ही कार दोन मालकांच्या नावावर नोंदणीकृत

तपासात असे दिसून आले की ही फोर्ड इकोस्पोर्ट पूर्वी पंकज गुप्ता यांच्या नावावर नोंदणीकृत होती, तर सध्या ती उमर नबी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ही कार पंकजकडून उमरकडे कशी गेली आणि त्यादरम्यान इतर कोणत्याही व्यक्तींनी किंवा नेटवर्कने ती वापरली का याचा तपास पोलिस आता करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Red ford ecosport alert delhi police search umar mohammad red ford eco sport car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi blast

संबंधित बातम्या

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना
1

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड
2

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.