Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेल्या Hyundai i20 च्या मालकाने केल्या 'या' चुका
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत या भीषण स्फोटामुळे 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की काही जणांच्या शरीराचे अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. सध्या दिल्लीसह देशातील महत्वाची शहरे हाय अलर्टवर गेली आहेत. हा स्फोट घडवण्यासाठी Hyundai i20 कारचा वापर करण्यात आला होता.
माहितीनुसार, या स्फोटाच्या चौकशीत असे दिसून आले की Hyundai i20 ची नोंदणी ट्रान्सफर न करता अनेक राज्यांमध्ये अनेक वेळा विक्री करण्यात आली होती. सेकंड-हँड कार विकताना मालकी हक्क ट्रान्स्फर महत्त्वाचे असले तरी, त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी, कार खरेदी करताना किंवा विकताना काही सोप्या नियमांचे पालन करावे लागते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
HR26CE7674 रजिस्ट्रेशन क्रमांक असलेली Hyundai i20 ही कार 2013 मध्ये तयार करण्यात आली होती. 2014 मध्ये, या कारला तिचा दुसरा मालक मिळाला, जो गुरुग्रामचा रहिवासी सलमान होता. मात्र, नंतर ती दिल्लीतील ओखला येथील रहिवासी देवेंद्रला विकण्यात आली. त्यानंतर, ती अंबाला येथील एका माणसाला आणि नंतर जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील तिचा नवीन मालक आमिरला विकण्यात आली.
Hyundai i20 ची खरेदी विक्री इथेच थांबली नाही तर ती संशयित आत्मघाती बॉम्बर असलेल्या डॉ. उमर मोहम्मदला देण्यात आली.
दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेली i20 कार शेवटची फरीदाबादमधील रॉयल कार झोनमधील ‘सोनू’ नावाच्या डीलरमार्फत स्फोटाच्या फक्त चार दिवस आधी विकली गेली होती. यावरून असे दिसते की डीलरने काही खर्च वाचवण्यासाठी नवीन मालकाच्या नावावर कारचे रजिस्ट्रेशन करण्यास दुर्लक्ष केले आणि यामुळे मागील मालकाचा कारण नसताना संशयितांच्या यादीत समावेश झाला आहे.
म्हणूनच, मालकी हक्क ट्रान्स्फर पडताळणी आणि संपूर्ण तपासणीची हमी देणाऱ्या विश्वसनीय कार विक्री प्लॅटफॉर्मद्वारे तुमचे वाहन विकणे नेहमीच उचित असते.
Dharmendra यांच्या Car Collection वर एकदा नजर टाकाच, पहिली कार तर फक्त 18,000 रुपयात केली होती खरेदी
ही कार वेगवेगळ्या खरेदीदारांना विकली जात असल्याने, कोणीही मालकाच्या नोंदींकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच कार विक्री करण्यापूर्वी मालकाने सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. यामध्ये आरसी बुक, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, सेवा इतिहास आणि कर पावत्या यांचा समावेश आहे.
भविष्यात कोणत्याही जबाबदारीपासून वाचण्यासाठी विद्यमान इन्शुरन्स पॉलिसी नवीन मालकाच्या नावावर ट्रान्सफर झाली आहे की नाही हे सुनिश्चित करा. वाहनाचं मालकी हक्क बदलताच तुम्ही इच्छित असाल तर जुनी पॉलिसी कॅन्सल देखील करू शकता.
मालकी हक्क जलद गतीने ट्रान्सफर व्हावा यासाठी वाहन विक्रीपूर्वी कोणताही थकीत कर्ज, चालान किंवा सर्व्हिस शुल्क बाकी राहू देऊ नका. स्वच्छ आणि स्पष्ट रेकॉर्डमुळे ट्रान्सफर प्रक्रिया अधिक वेगवान होते.
मालकी हक्क अधिकृतपणे बदलण्यासाठी RTO कार्यालयात फॉर्म 28, 29 आणि 30 सादर करणे आवश्यक आहे. फॉर्म 28 हा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) मिळवण्यासाठी असतो, तर फॉर्म 29 आणि 30 हे मालकी हक्क ट्रान्स्फरशी संबंधित असतो. भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण उद्भवू नये म्हणून या फॉर्म्सच्या सबमिशन रसीदेची प्रत नेहमी तुमच्याकडे ठेवा.






