सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठीचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले आहे. बोगद्याच्या आत एक रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल.उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशीमधील (Uttarkashi) सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला (Uttarkashi Tunnel Rescue Operation) यश मिळाले आहे. या बोगद्यातून 41 मजूरांना बाहेर काढण्यात येत आहे. या मजुरांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा, लष्कराचे जवान प्रयत्न करत होते. मोठ्या मशिन्सही मागवण्यात आल्या होत्या. अखेर 17 दिवसांनी या बचाव मोहिमेला यश मिळाले आहे.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Micro tunnelling expert Chris Cooper says, “Three workers have come out. All the members of the rescue team are very happy…” pic.twitter.com/MylmYN2q6r — ANI (@ANI) November 28, 2023
एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा टीमला मोठे यश मिळाले आहे. येत्या काही मिनिटांत कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू होईल, असे येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करण्यात आला. या नुसार खोदकामही पूर्ण झाले आहे. या तंत्राचा वापर करत एक सैनिक बोगद्यात घुसला असून येथूनच बोगद्यातून ४१ कामगार बाहेर काढण्यात येत आहेत.
बोगद्यातून कामगारांची सुटका करण्यास सुरुवात
41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. 5 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित कामगारांनाही एक एक करून बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्याच्या आत आहेत.
कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची तयारी सुरू – धामी
सीएम धामी यांनी ट्विट करून म्हटले – सिल्कियारा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यात मोठे यश मिळाले आहे, ढिगाऱ्यातून पाईप पुशिंगचे काम करण्यात आले आहे. आता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue: CM Pushkar Singh Dhami meets the workers who have been rescued from inside the Silkyara tunnel pic.twitter.com/f4JsRKsqmJ — ANI (@ANI) November 28, 2023






