Cobbler Repairs Rs 5,000 Shoes ( 32कारागिराने 5000 रुपयांचे बूट दुरुस्त केले. )
झाले असे की, एका इनस्टाग्राम युजर्सने आपले चेल्सी बूट रिक्षात अडकून फाटले. त्याला वाटले की, आता हे बूट कायमचे गेले. त्याने हे बूट बनवण्यासाठी अनेक मोठ मोठ्या दुकानदारांना दाखवले. पण प्रत्येक ठिकाणी त्याला नकार देण्यात आला. प्रत्येक दुकानदाराचे एकच म्हणणे होते. “भाऊ, हे बूट नीट दुरुस्त होऊ शकत नाहीत.” असे सांगण्यात आले.
नतंर त्याला बिजनौरमधील ‘राम चौकात’ बसलेला एक कुशल कारागिर भेटला. त्यांने ज्या पद्धतीने हे चेल्सी बूट दुरुस्त केले, ते पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यांचे कौशल्य, संयम आणि ‘जुगाड’ करण्याची जबरदस्त पद्धत यांमुळे त्याचे खराब झालेले बूट पुन्हा नव्यासारखे झाले.
5 हजारांचे बूट इतक्या मेहनतीने आणि कौशल्याने दुरुस्त केल्याबद्दल, त्या कारागिराला मनापासून सलाम आणि खूप खूप धन्यवाद, अशा प्रतिभावान स्थानिक कारागिरांना नक्कीच पाठिंबा आणि दाद मिळायला हवी. जर तुम्ही बिजनौरचे असाल आणि या कारागिराला ओळखत असाल, तर कृपया कमेंट्समध्ये त्यांचे नाव सांगा. तुम्ही कधी एखादी महागडी वस्तू फेकून न देता ती दुरुस्त करून घेतली आहे का? तुमचा अनुभव नक्की सांगा. असे म्हटले आहे.
Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले
मोचीने शूज पुन्हा नव्यासारखे केलेल्याने त्याच्या कौशल्याचे नेटकऱ्यांकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मिडिया युजर्सने म्हटले आहे की,
“भारत प्रतिभांनी परिपूर्ण आहे, दुर्दैवाने गरिबी आणि संधींचा अभाव चमकण्याच्या महत्त्वाकांक्षा नष्ट करतो.”
“गरीबांच्या घरात नेहमी कला जन्माला येते ”
“चुका आणि कमी काढल्या शिवाय काम बनत नाही, लोकांचे आजकल”






