मोहम्मद इम्रानचे बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद (फोटो- सोशल मिडिया)
कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत पहिल्या पटावरील लढतीत मोहम्मद इम्रानने तामिळनाडूच्या सुदर्शन बालाजीचा पराभव केला. किंग्ज इंडियन ओपनिंग पद्धतीने डावाची सुरुवात करणाऱ्या इम्रानने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ४२ चालींमध्ये सुदर्शनवर मात केली. या विजयासह त्याने ९ गुणांसह स्पर्धेतील अव्वल स्थान निश्चित केले. मोहम्मद इम्रान सध्या अमेरिकेत बारावी इयत्तेत पीसीएम विषयांचे शिक्षण घेत आहे. बुद्धिबळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले.
आंध्रप्रदेशच्या भवन कोल्लाने चंदीगडच्या गगन साहूला बरोबरीत रोखत ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या प्रथमेश शेरलाने तामिळनाडूच्या अधविक देव ए.के. याचा पराभव करत ७ गुणांची कमाई केली. तसेच ५१.५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या आधारे त्याने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेतील विजेता मोहम्मद इम्रान याला करंडक आणि ६० हजार १०० रुपये, उपविजेता भवन कोल्ला याला करंडक व ४० हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रथमेश शेरला याला करंडक व २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे सहसचिव विवेक भागवत, पीडीसीसीचे खजिनदार राजेंद्र शिदोरे, एफडीएच्या सहआयुक्त प्रीती टिपरे आणि पीडीसीसी कार्यकारी समितीचे सदस्य केतन खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमकेएनएसच्या प्राचार्या वर्षा कोकिल, स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा वंदना हलकुडे, स्पर्धेचे आयोजन सचिव नागनाथ हलकुडे, स्पर्धा संचालक योगेश महामुनी, पीडीसीसी कार्यक्रम समितीचे सदस्य अभिजीत जोशी, चीफ आर्बिटर नितीन शेणवी आणि डेप्युटी चीफ आर्बिटर आयए आम्रीश तल्लू आदी उपस्थित होते.
जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल
Ans: आंध्र प्रदेशच्या मोहम्मद इम्रानने विजेतेपद पटकावले. नवव्या आणि अंतिम फेरीअखेर त्याने ९ गुणांची कमाई केली.
Ans: मोहम्मद इम्रानने अंतिम फेरीतील पहिल्या पटावरील लढतीत तामिळनाडूच्या सुदर्शन बालाजीचा पराभव केला.






