झाडांना पाणी घालताना 14 व्या मजल्यावरून खाली पडून शरीराचे दोन तुकडे, भयावह मृत्यू; हरयाणातील धक्कादायक प्रकार
चंदीगड: चंदीगडमधून एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीचा १४ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला व्यक्ती बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे समजते आहे.
हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे एका बहुमजली बिल्डिंगमध्ये १४ व्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १४ व्या मजल्यावरील स्कायवॉक कोसळल्याने निवृत्त बँक मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. इथे राहणाऱ्या काही नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका बहुमजली इमारतीच्या स्कायवॉकवर असलेल्या झाडाना ते निवृत बँक अधिकारी पाणी घालत होते. या दरम्यान त्यांचा तोल ढासळला आणि ते खाली असलेल्या पुलावर कोसळले. पुलावर कोसळले असल्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.
मृत्यू झालेले व्यक्ती निवृत्त बँक अधिकारी होते. त्यांच्या पाठीमागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कुटुंब बहुमजली इमारतीमध्ये १४ व्या मजल्यावर राहतात. त्यांच्या मजल्यावरून एका. टॉवरपासून दुसऱ्या टॉवरपर्यंत जाण्यास स्कायवॉक आहे. त्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत.
झाडांना पाणी घालत असताना त्या स्कायवॉक वरील गांजलेल्या भागावर त्यांचा पाय गेल्याने त्याचा तोल गेला. तिथून पडून ते खाली असलेल्या पुलावर कोसळले आणि त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. हा अपघात झाल्याचे कळताच शेजारील नागरिकांनी कुटुंबाला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस पुढील कारवाई करत असून त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अंगावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोथरूड भागातील कर्वेनगर परिसरात एका पोलीस चौकीजवळ दुचाकी चालकाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. झाड बाजूला करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. दरम्यान शहरात मुसळधार पाऊस आणि सोबत वाराही सुटलेला आहे. काल दिवसभरात झाडपडीच्या 15 हून अधिक घटना घडल्या आहेत. राहुल जोशी (वय 45, रा. धायरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Pune News : पुण्यात दुर्दैवी घटना; अंगावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
मिळालेल्या माहीतीनुसार, राहुल जोशी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. ते कर्वेनगर भागातून धायरीकडे जात होते. ते कर्वेनगर येथील पोलीस चौकीजवळ आले असता त्यांच्या चालत्या गाडीवर अचानक मोठे झाड कोसळले. यात डोक्याला आणि इतर ठिकाणी जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.