
चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर
या सर्व प्रकारात मतदार उमेदवारांना विचारत आहेत की, त्यांना साड्या देण्यास कोणी सांगितले होते? आम्ही मतदान केले नाही याची तुमच्याकडे काय खात्री आहे, असा सवालही ते करत आहेत. तुम्ही पैसे दिलेच का? असा प्रश्न मतदार विचारत आहेत. दुसरीकडे, इतका खर्च करूनही आपल्याला फक्त ८० मते मिळाली, याचे दुःख ज्योती यांनी व्यक्त केले. त्यांना या भागातून एकही मत मिळाले नाही. आता आपल्याला अशा राजकारणाची गरज नाही, असे त्या म्हणाल्या, दरम्यान, ज्योती यांनी पैसे आणि साड्या गोळा करण्याची घटना सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
मुदु चिंतलापल्ली नगरपालिकेच्या एकूण २४ वॉडांपैकी बीआरएस पक्षाने १४ वॉर्ड जिंकले, नगरपालिकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी बहुमत गाठले आहे. तर काँग्रेस पक्षाला केवळ ९ वॉर्डात विजय मिळाला. भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. बीआरएसने या नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर कब्जा केला आहे.
तेलंगणात ११ फेब्रुवारी रोजी मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक उमेदवारांनी प्रति मत २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत रोख रक्कम वाटण्यात आली. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर आणि साड्यांचे वाटप करण्यात आले होते. वैश्य मतदारांसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांना असा संशय आहे की, काही वसाहतींमधील मतदारांनी प्रलोभने स्वीकारूनही त्यांना मतदान केले नाही. याच संशयावरून उमेदवार आता वसाहतींमध्ये जाऊन मतदारांशी वाद घालत आहेत. पैसे आणि वस्तू वाटूनही निकाल विरोधात गेल्याने उमेदवारांनी घातलेल्या या गोंधळामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी
उमेदवारांच्या या वागणुकीवर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. “आम्ही उमेदवारांकडे पैसे किंवा भेटवस्तूंची मागणी केली नव्हती. त्यांनी स्वतःहून त्या दिल्या आणि आता त्या परत मागणे हे पूर्णपणे चुकीचे आणि अनैतिक आहे,” असे मत स्थानिक मतदारांनी व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात एक पराभूत उमेदवार महिलांना वाटलेल्या साड्या परत गोळा करताना दिसत आहे. हैदराबादजवळील येलमपेट नगरपालिकेत एका पराभूत अपक्ष उमेदवाराच्या पतीने लोकांच्या घराबाहेर जाऊन गोंधळ घातला. त्याने मतदारांना दोनच पर्याय दिले – एकतर दिलेले पैसे परत करा किंवा माझ्या पत्नीलाच मतदान केले आहे, अशी देवासमोर शपथ घ्या. असा तगादा लावला. तर मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यात एका उमेदवाराने मतमोजणी संपताच कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांवर पैशांसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.