चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात 'पॅक्स सिलिका' करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा
पॅक्स सिलिका करारांतर्गत भारत आणि अमेरिकेत एआयच्या भागीदारीवर आधारित करार करण्यात आला आहे. याअंतर्गत खनिजे, सेमीकंडक्टर उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या उर्जा गरजा आणि संगणकीय क्षमतेला अधिक चालना मिळेल. यामध्ये केवळ एआयचा विकासच नव्हे, तर दोन्ही देशांत विश्वासार्ह आणि मुक्त व्यापार तत्वांवर आधारित करार असून दोन्ही देशांमध्ये यावर सहमती झाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी ट्रस्ट या उपक्रमाद्वारे दोन्हीदेशांचे धोरणात्मक संबंध लक्षणीरित्या मजबूत केले आहेत.दोन्ही देश एआयला मानवतेच्या प्रगतीसाठी एक मोठी संधी म्हणून पाहत आहे. दोन्ही देशांच्या मते एआय मानवासाठी धोकादायक नसून लोकशाही देशांनी त्याचे नेतृत्व करणे आह.
भारत आणि अमेरिकेत या करारांतर्गत संशोधन आणि विकास उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे. दोन्ही देशांत कुशल मनुष्यबळ, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रशिक्षणचा विस्तार केला जाणार आहे. एक विश्वासार्ह सेमीकंडक्टर इकोसिस्टम देखील तयार करण्याचे या करारांतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या भागीदारीला यशस्वी करण्यासाठी खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. दोन्ही देश सीमापार व्हेंचर कॅपिटल प्रवाह आणि पुढच्या पिढीच्या डेटा सेंटर्समधील गुंतवणूक वाढीसाठी काम करणार आहेत. यामुळे स्टार्टअप्स आणि डेव्हलपर्सना एआय प्रणाली जागतिक स्तरावर विकसित करण्याची संधी मिळेल. दोन्ही देशांमधील हा करार लोकशाही मूल्याचा भाग आहे. दोन्ही देशांनी समृद्धीच्या मार्गावर एकत्रित सहकार्याचे वचन दिले आहे.
हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक धोरणात्मक आंतरराष्ट्रीय पुढाकार आहे. या करारांतर्गत दोन्ही देशांत केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे, तर जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी एआय करार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेमीकंडक्टरसाठी लागणारी पुरवठा साखळी (Supply Chain) सुरक्षित आणि मजबूत ठेवण्याचा या कराराचा उद्देश आहे.






