मोठी बातमी! बिहार विधानसभेत राडा, भाजप-राजदच्या आमदारांमध्ये हाणामारी
मतदार यादी फेरपडताळणीवरून राजकीय वातापरण तापलं असतानाच आज बिहार विधानसभेत राजद आणि भाजप आपदारांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून मार्शलना हस्तक्षेप करावा लागला आहे. या राड्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी संध्याकाळी चार वाजता कामकाज तहकूब केलं तरी दोन्ही आमदार एकमेकांसमोर दंड थोपटून उभे होते.
‘आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही’; बिहार मतदार यादी फेरपडताळणीवरून राहुल गांधींचा इशारा
तेजस्वी यादव यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. सभागृहातील माझ्या भाषणात सतत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत होता. माझ्या पालकांना शिवीगाळ केली जात होती पण मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ती व्यक्ती माझ्या आई आणि बहिणींना शिवीगाळ करत होती. व्हिडिओ रेकॉर्डिंग जनतेसमोर आणा, अशी मागणी सभापतींकडे आहे आहे. काल उपमुख्यमंत्री शिवीगाळ करत होते. आज त्यांचे शिष्य शिवीगाळ करत आहेत. आम्ही या मुद्द्यावर बोलत होतो. भाजपच्या गुंडांमध्ये आता सत्य ऐकण्याची हिंमत नाही. सत्ताधारी पक्षाचेच सदस्य सभागृहात गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तेज प्रताप यादव यांनी विधानसभेत घडलेल्या या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सम्राट चौधरी यांनी ज्या पद्धतीने माझ्या वडिलांवर आरोप केले. आम्ही आत जात नाही, पण जर सभागृहात असतो तर त्यांचा पारा उतरवला असता. सम्राट चौधरी हा गुन्हेगारी प्रतिमेचा व्यक्ती आहे. त्यांचा आदर कमी झाला आहे. सरकार ऐकत नाही त्यामुळे राजदचे आमदार काळे कपडे घालून निषेध करत असल्याचं ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली, ते म्हणाले की, ‘आता नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत. अमित शाह ८ तारखेला सीतामढीला येत आहेत, त्यांनी घोषणा करावी की नितीश कुमार हे २०२५ ते २०३० पर्यंत एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा असतील. सरकार आता १५ वर्षे जुनी गाडीही चालवू देत नाही. तेजस्वी यांनी नितीश सकारवर त्यांच्या योजना चोरल्याचा आरोप केला. २०२० मध्ये आम्ही १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा नितीश कुमार म्हणाले होते, तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळतील का? आता आमच्या योजना चोरीला जात आहेत. आम्ही २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, तुम्ही १२५ युनिट दिले, तुम्ही २०० देऊ शकला असता. आम्ही युवा आयोगाबद्दल बोललो, तुम्ही लगेचच मंत्रिमंडळात त्याची स्थापना केली. मी आत्मविश्वासाने सांगतो, नितीश सरकार माई-बहन योजनाही चोरेल, अशा घणाघात त्यांनी केला.
मोठी बातमी! मतदार यादीतून तब्बल ५१ लाख मतदारांची नावं वगळणार, बिहारच्या राजकारणात खळबळ
त्यावर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तेजस्वी यांच्या आरोपांवर पलटवार केला. ते म्हणाले की, ‘गुन्हेगार आणि दरोडेखोराचा मुलगा या पेक्षा वेगळं काय बोलणार?’ या विधानाने सभागृहात गोंधळ उडाला. तेजस्वी यांनी सम्राट चौधरींवर निशाणा साधला आणि म्हणाले की, ‘सम्राटजी म्हणतात की पेपर बिहारमध्ये लीक झाला नव्हता. त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं.’त्यावर सम्राट चौधरी म्हणाले की, ‘मी असे म्हटले आहे हे सिद्ध करा.’ यानंतर सभागृहात गोंधळ उडाला.
दरम्यान, मेहबूब आलम यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल टिप्पणी केली, त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. यानंतर सभागृहातील आमदारांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि वेलमध्ये पोहोचले. मार्शलनी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली. सभापती गेल्यानंतरही विरोधी आमदार वेलमध्येच राहिले. दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज दुपारच्या जेवणासाठी तहकूब करण्यात आलं. यादरम्यान सम्राट चौधरी यांनी २०२३-२४ चा कॅग अहवालही सभागृहात सादर केला.
यानंतर, सभागृहातील आमदारांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि वेलमध्ये पोहोचले. मार्शलनी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली. सभापती गेल्यानंतरही विरोधी आमदार वेलमध्येच राहिले. कामकाज तहकूब करण्यात आले. यादरम्यान सम्राट चौधरी यांनी २०२३-२४ चा कॅग अहवालही सभागृहात सादर केला.