नवी दिल्ली: यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने संघ देशातील प्रत्येक भागात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मसुलीम धर्मगुरुंमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमधील हरियाणा भवनमध्ये मुस्लिम धमर्गुरूंसोबत बैठक केली आहे. मात्र या भेटीचे नेमके काय कारण आहे, ते जाणून घेऊयात.
आज झालेल्या बैठकीत संघाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्त्तात्रय होसबळे, कृष्ण गोपाळ, रामलाल, इंद्रेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. संघाच्या आजचा बिटकीचा उद्देश विविध समुदायांशी संवाद वाढवणे, तसेच सामाजिक सौहार्द अधिक मजबूत करणे हा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लिम मंच सातत्याने मुस्लिम समाजातील अभ्यासक, धमर्गुरु यांच्यासोबत संवाद वाढवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. २०२३ मद्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचाकडून एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रगीत या भावनेतून अल्पसंख्यांक समाजाशी राष्ट्रव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील मुस्लिम समाजाशी चर्चा केली होती. यावेळी सरसंघचालक आणि मुस्लिम समाजात ज्ञानवापी मशीद, हिजाब वाद, जनसंख्या नियंत्रण कायदा याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात होते.
यंदाचे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष असणार आहे. या वर्षी संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. डॉ. हेडगेवार हे संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक होते. शताब्दी वर्षानिमित्त देशातील कानाकोपऱ्यात आपले विचार पोहोचावेत यासाठी संघ प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना हिंदू समाजाला एकत्रित आणणे आणि सशक्त करणे यासाठी केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा हिंदुत्वावर आधारित आहे, जी भारतीय मूल्ये आणि संस्कृतीला प्रोत्साहन देते. यंदा १०० वर्षे पूर्ण होणार असल्याने हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष असणार आहे. तसेच आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुल्सिम धमर्गुरूंशी महत्वाची बैठक केलेली आहे. विविध समुदायांशी संवाद वाढवणे हा बैठकीचा हेतू असल्याचे म्हटले जात आहे.