Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझी लढाई मुस्लिमांशी नाही…; बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर होणार असल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 07, 2026 | 05:12 PM
CM Devendra Fadnavis on Mumbai Muslim woman mayor statement by Waris Pathan

CM Devendra Fadnavis on Mumbai Muslim woman mayor statement by Waris Pathan

Follow Us
Close
Follow Us:

BMC Elections 2026 : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर होणार असल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर मराठीच झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना-मनसेकडून केली जात आहे. तर हिंदू महापौर भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल,” अशी इच्छा वारिस पठाण यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होणार का यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जेव्हा वारिस पठाण यांनी हे सांगितले तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही; त्यांनी तोंडाला कुलूप घातले. पण मी पुन्हा एकदा सांगतो की मुंबईचा महापौर एक हिंदू, एक मराठी असेल.” अशी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

माझा लढा मुस्लिमांशी नाही – फडणवीस

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा धर्म प्रत्येक धर्माचा आदर करतो. माझ्या धर्मात कुठेही इतर धर्माच्या लोकांविरुद्ध जिहाद पुकारण्याचे म्हटलेले नाही. माझ्या धर्मात जिहाद अस्तित्वात नाही. मी कधीही सर्व मुस्लिमांना दोष देत नाही. जे या देशावर प्रेम करतात ते देखील मुस्लिम आहेत. माझा लढा त्या मुस्लिमांशी आहे जे भारतात राहतात आणि वंदे मातरम म्हणत नाहीत. जे या देशात राहतात पण ते या देशाला स्वतःचे मानत नाहीत, असे मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी

काय म्हणाले होते वारिस पठाण?
अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौर पदाबाबत वारिस पठाण यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकतं? आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल. मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे वक्तव्य करणारी व्यक्ती जर महापौर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापौर होऊ शकत नाही? असे मत एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी व्यक्त केले.

Web Title: Cm devendra fadnavis on mumbai muslim woman mayor statement by waris pathan political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • devendra fadnavis
  • Muslim Community

संबंधित बातम्या

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार
2

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला
3

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

BJP Alliance MIM And Congress:  MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा
4

BJP Alliance MIM And Congress: MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.