'शहरी जीवन, प्रेम, विरह अन् आध्यात्म'; गोकर्णमधील गुहेत सापडलेली रशियन महिला अन् गोल्डस्टीनची वेदनादायक स्टोरी, वाचा सविस्तर
शहरी जीवनशैलीत माणूस स्वत: कुठेतरी हरवत चालला आहे. दिवसभर धावपळ, ताण, जबाबदाऱ्या यातून नात्यांमधली गुंतागुंत वाढत चाललीय. एका रशियन महिलेने हजारो मैलांवरून भारतात येत हे सिद्ध केलंय. जगापासून वेगळ होत धाडसी निर्णय घेत निसर्गातील एकांत निवडते. कर्नाटकातील आणि भारतातील घनदाट जंगलांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कारवारमध्ये विसावते, तेही दोन चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन…पावलापावलावर जंगली श्वापदांचा वापर, डोंगर खचण्याची भीती आणि मदतीशिवाय जगण्याची भीती तिने फोल ठरवलीय.
रशियन महिलेने गोकर्णजवळील गुहेत ७ वर्षे कशी काढली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरून सुरू झालेला हा प्रवास थेट गोकर्णच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या एका गूढ गुहेत येऊन थांबतो. मागे राहिलंलं अर्धवट आयुष्य. लहान मुली आणि एक बाप असा, निसर्गाच्या सान्निध्यात ध्यानधारणेत रमलेल्या निना कुटीनाच्या या आध्यात्माचा वेदनादायी प्रवास आहे.नीना कुटीना मूळची रशियाची आहे. स्वतःला जगापासून वेगळ करत आध्यात्मिक एकांतात रमण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या या निर्णयाने तिचा पती ड्रोर गोल्डस्टीन यांचं आयुष्य पार बदलून टाकलं.
इस्रायलचा रहिवासी ड्रोर गोल्डस्टीन, आठ वर्षांपूर्वी गोव्यात नीना कुटीना या रशियन महिलेच्या प्रेमात पडला. काही महिने भारतात एकत्र राहत त्यांनी पुढे इस्रायलमधून आपल्या संसाराचा गाढा सुरू ठेवला. त्यांच्या सहजीवनातून प्रेमा (६) आणि अमा (५) या दोन गोंडस मुलींचा जन्म झाला.सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. पण काही महिन्यांपूर्वी अचानक नीना मुलींना घेऊन गोव्यामधून गायब झाली. “ती काहीही न सांगता निघून गेली. मला काहीच माहिती नव्हती की माझ्या मुली कुठे आहेत, कशा आहेत.” असं ड्रोर सांगतात.
गोल्डस्टीन यांनी तात्काळ त्याची पत्नी आणि मूलं हवल्याची तक्रार नोंदवली. अनेक आठवड्यांच्या शोधानंतर, ११ जुलै रोजी गोकर्णमधील रामतीर्थ डोंगरावर, एका नैसर्गिक गुहेत पोलिसांनी नीना आणि तिच्या दोन्ही मुलींना शोधून काढलं. शहरी जीवनापासून वेगळ्या जंगलाच्या स्मशानशांततेत त्या ध्यानधारणा करत राहात होत्या.ड्रोर भारतात गेल्या चार वर्षांत वारंवार येत होता, तो केवळ आपल्या मुलींना भेटण्यासाठी. “मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, पण ती (नीना) मला मुलींसोबत वेळ घालू देत नव्हती. खूप अडचणी निर्माण करत होती,” असं त्यांनी सांगितलं.
ड्रोरचं म्हणणं आहे की त्यांनी नीना आणि मुलींची आर्थिक जबाबदारीही स्वीकारलेली आहे. “मी दरमहा नीना यांना भरपूर आर्थिक मदत पाठवतो. माझ्या मुलींना काही कमी पडू नये याची मी पूर्ण काळजी घेतो,” असंही त्यांनी सांगितलं. ड्रोर यांना सर्वात मोठी भीती आहे ती म्हणजे नीना त्यांच्या मुलींना रशियाला घेऊन जाईल. “जर त्या रशियात गेल्या, तर माझ्यासाठी त्यांच्याशी संपर्क ठेवणं जवळपास अशक्य होईल. मुलींना देशाबाहेर जाण्यापासून रोखावं,अशी विनंती मी भारत सरकारकडे करत आहे” असं ते म्हणाले.
कर्नाटकातील घनदाट जंगलात आढळली रशियन महिला; दोन मुलींसह गुहेत अनेक वर्षे वास्तव्य
नीना कुटीना यांचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःहून ही निवड केली. “शहरी जीवनाच्या गोंगाटात मी स्वत: कुठेतरी हरवत चालले होते. म्हणून मी निसर्गात घनदाट जंगलात आसरा घेतला, असं तिने सांगितलं. मात्र तिने वापरलेला व्हिसा २०१७ मध्येच कालबाह्य झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तिला गोवा FRRO कडून एक्झिट परमिटही देण्यात आलं होतं. पण नंतर ती नेपाळमार्गे पुन्हा भारतात आली होती.