Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satya Pal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, आरएमएल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Satya Pal Malik Death News : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2025 | 02:25 PM
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, आरएमएल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य-X)

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, आरएमएल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Satya Pal Malik Death News in Marathi : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. ते बराच काळ आजारी होते. त्यांनी आज म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी आरएमएल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. पूर्वी ते भाजपचे एक प्रबळ नेते होते. सत्यपाल मलिक यांना मे २०२५ पासून दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या गंभीर आजारामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज (5 जुलै) दुपारी रुग्णालयाने सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती दिली. तसेच एक दिवस आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचेही दिल्लीत निधन झाले. शिबू सोरेन यांनी सोमवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज ते पंचतत्वांमध्ये विलीन झाले.

अरे देवा! मृत आईच्या खात्यात जमा झाले 100135600000000000100235600000000299 रुपये , 36 अंकी रक्कम पाहून मुलगाही थक्क

सत्यपाल मलिक कोण होते

सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला. ते उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावचे रहिवासी होते. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी आणि एलएलबीची पदवी घेतली. त्यांनी १९६८-६९ मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि १९८० ते १९८९ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगडमधून नवव्या लोकसभेचे सदस्य होते.

त्यांच्या कार्यकाळात कलम ३७० रद्द

सत्यपाल मलिक यांनी ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बिहार आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील सुरक्षेतील त्रुटी आणि किरू जलविद्युत प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी उघडपणे भाष्य केले, ज्यामुळे ते वादातही राहिले. नंतर ते भाजपचे प्रमुख टीकाकार बनले.

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा

Web Title: Satyapal malik death news former jammu and kashmir governor passed away news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • BJP
  • india
  • Satyapal Malik

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
2

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
3

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.