Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Sanjay Raut : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात शेवटपर्यंत नेहरूच राहतील, असे ते म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Nov 13, 2026 | 09:56 PM
sanjay raut

sanjay raut

Follow Us
Follow Us:
  • नेहरूंच्या जयंती कार्यक्रमात राऊतांचा भाजपवर निशाणा
  • ‘नेहरूंनी टीका सहन केली, ईडी-सीबीआयच्या धाडी टाकल्या नाहीत – राऊत
  • व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षतेवर राऊतांचे भाष्य
 

मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित ‘भारत भाग्यविधाता’ कार्यक्रमात राजकीय वातावरण चांगलेच रंगले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन करण्याचा प्रयत्न केला तरी या देशात शेवटपर्यंत नेहरूच राहतील, असे ठणकावून सांगत त्यांनी नेहरूंच्या विचारांचे समर्थन केले. (Sanjay Raut)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारत भाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, नेहरू हे व्यक्तिस्वातंत्र्याचे खरे प्रणेते होते. त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी त्यांनी विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली नाही.

नेहरूंवर टीका करणाऱ्यांच्या घरी त्यांनी ईडी किंवा सीबीआयच्या धाडी टाकल्या नाहीत, असा टोला राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीला उद्देशून लगावला.

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’

व्यंगचित्रकार शंकर यांचा दाखला देत राऊतांचा टोला

नेहरूंच्या सहिष्णुतेचे उदाहरण देताना राऊत यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांचा उल्लेख केला. शंकर यांनी नेहरूंचे व्यंगचित्र काढले होते, मात्र नेहरूंनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. आजच्या काळात पंतप्रधानांचे असे व्यंगचित्र काढल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते, अशी टीका त्यांनी केली.

नेहरू धर्मनिरपेक्ष आणि दूरदृष्टीचे नेते होते. भाकरा-नांगल धरण, आयआयटी संस्था आणि अणुऊर्जा क्षेत्राच्या विकासातून त्यांनी देशाला वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. विरोधी विचारांच्या लोकांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे राऊत म्हणाले.

नेहरूंचा जागतिक दृष्टिकोन पुन्हा आत्मसात करा – कुमार केतकर

यावेळी माजी खासदार कुमार केतकर यांनीही नेहरूंच्या विचारांचे महत्त्व सांगितले. आज जगात युद्धजन्य परिस्थिती असताना नेहरूंचा शांततेचा आणि जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळणे ही भारतीय लोकशाहीची महत्त्वाची उपलब्धी असल्याचे केतकर यांनी सांगितले. नेहरूंचा वैश्विक दृष्टिकोन आजही मार्गदर्शक ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, कुमार केतकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी नेहरूंबाबत काय विधान केले?

    Ans: नरेंद्र मोदी आणि भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात शेवटपर्यंत नेहरूच राहतील, असे संजय राऊत म्हणाले.

  • Que: नेहरू जयंतीनिमित्त 'भारत भाग्यविधाता' कार्यक्रम कुठे झाला?

    Ans: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • Que: कुमार केतकर यांनी नेहरूंच्या कोणत्या विचारांवर भर दिला?

    Ans: कुमार केतकर यांनी नेहरूंचा जागतिक दृष्टिकोन, शांतता, लोकशाही आणि सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले,

Web Title: Sanjay raut jawaharlal nehru jayanti pm modi bjp criticism vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Pandit nehru
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’
1

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
2

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं
3

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी
4

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.