eknath shinde with 12 mp
दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे सध्या दिल्लीत आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena’s 12 Mps Meeting With Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. आता ते नव्या गटनेतेपदाचं पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचं कार्यालय मिळावं यासाठी हालचाली सुरु आहेत.
[read_also content=”मराठमोळ्या प्रियांका मोरेची बंगाली फिल्म, ‘घासमोजी’ स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार https://www.navarashtra.com/movies/marathi-director-priyanka-mores-shortfilm-ghasmoji-selcted-for-stuttgart-film-festival-nrsr-305907.html”]
दरम्यान एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. शिंदे आज शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सध्या सर्व खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत असतानाच सोमवारी रात्री शिंदे सुद्धा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपाबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्येही फूट पडली.