Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : “राजकारणात राहुल गांधी खूपच अपरिपक्व…”, श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं विधान हे राजकारणात खूपच अपरिपक्व असल्याची कबुली देते, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2025 | 06:06 PM
श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)

श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात देशातील सर्वच नेत्यांनी एकजूट दाखवायला हवी. जगाला भारत एक आहे हे दाखवले पाहिजे, मात्र त्याऐवजी विरोधक राजकारण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं विधान हे राजकारणात खूपच अपरिपक्व असल्याची कबुली देते, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर केली. आफ्रिकेतील चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.

जगाचं काही खरं नाही! आता टोमॅटोमुळे ओढवू शकतो मृत्यू, या देशाने परत मागवले टोमॅटो

यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे. भारतीय खासदारांची शिष्टमंडळांनी ३२ ते ३४ देशांचा दौरा केला. या देशांनी भारताला चांगला प्रतिसाद मिळाला. भारताबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर दिसून आला. कारण त्यांच्या अडचणीच्या काळात भारत त्यांच्या बाजूनं उभा राहिला होता, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मात्र विरोधकांना या गोष्टीत राजकारण करायचे आहे. राहुल गांधी यांना राजकारणात अजून समज यायची आहे, ते खूपच अपरिपक्व नेते असल्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करतात, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. काँग्रेस सरकारच्या काळात भारतात इतके दहशतवादी हल्ले का झाले, त्याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान खासदार डॉ. शिंदे यांनी दिले.

खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. खासदार डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने यूएई, काँगो प्रजासत्ताक गणराज्य, सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या देशांचा दौरा केला. यातील यूएई आणि सिएऱा लिओन हे दोन देश ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनचे सदस्य आहेत. काँगो प्रजासत्ताक आणि लायबेरिया प्रजासत्ताक हे दोन देशांना पुढच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचे अस्थायी सदसत्व मिळणार आहे. १४ दिवसांच्या दौऱ्यात तेथील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसदेचे सभापती, परराष्ट्र मंत्री, बुद्धीजीवी वर्गाशी चर्चा केली तसेच भारतीय समुदायाशी संवाद साधला असे डॉ. शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानकडून दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन , त्यांना दिली जाणारी ट्रेनिंग आणि दहशतवादी हल्ले, ऑपरेशन सिंदूर याविषयी प्रत्येक देशात जाऊन सविस्तर सांगण्याची संधी मिळाली. पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, टीआरएफ, हिजबुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आश्रयाला आहेत. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला. या दौऱ्यात प्रत्येक देश भारतासोबत उभा राहिला. त्यांनी या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामध्ये घडलेल्या हल्ल्याबाबत लायबेरिया आणि सिएरा लिओन या दोन देशांनी संसदेत मौन बाळगून आदरांजली वाहण्यात आली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

Census in India : मोठी बातमी! देशात जनगणना कधी सुरू होणार? तुमच्या घरी कधी पोचणार माणसं, जाणून घ्या

Web Title: Shrikant shinde on rahul gandhi is very immature in politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • india
  • Rahul Gandhi
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.