जगाचं काही खरं नाही! आता टोमॅटोमुळे ओढवू शकतो मृत्यू, या देशाने परत मागवले टोमॅटो
आपल्या रोजच्या आहारातील डाळ, भाजी, ते सॅलडपर्यंत, सर्वांमध्ये टोमॅटोचं स्थान महत्त्वाचं असतं. टोमॅटो शिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होणं अशक्यचं. साधी कल्पनाही करू शकत नाही. हाच टोमॅटो तुमच्या आहारातून गायब झाला तर..थोडं अवघड आहे, पण असं होऊ शकतं. कारण आहारातील प्रत्येक डीशला चव आणणारा हा टोमॅटो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. अमेरिकेत टोमॅटोमध्ये ‘साल्मोनेला’ नावाचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या एफडीए नुसार, टोमॅटोमध्ये या साल्मोनेला या विषानुच्या संसर्गामुळे गंभीर आरोग्य समस्या आणि मृत्यूचा धोका आहे. एफडीएने २८ मे रोजीच या संदर्भात गंभीर इशारा दिला आहे. टोमॅटोमध्ये साल्मोनेला संसर्गाची प्रकरणे खूप पूर्वीपासून येऊ लागली होती. हे टोमॅटो प्रामुख्याने जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमधून परत मागवले गेले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेत काम करणाऱ्या अनेक शेतमळ्यातून टोमॅटो परत मागवण्यास सुरुवात केली आहे.
साल्मोनेलाचा विषाणू कोरड्या आणि उबदार वातावरणात काही आठवडे जिवंत राहू शकतो, तर फ्रीजर किंवा ओलसर ठिकाणी त्याचे विषाणू अनेक महिने जिवंत राहतात. म्हणून, एफडीएने लोकांना टोमॅटो परत मागवण्याचा सल्ला दिला आहे आणि नागरिकांनी ते न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
टोमॅटोमध्ये पसरलेल्या साल्मोनेलाच्या संसर्गामागचं मूळ कारण किंवा स्रोत अद्याप समजू शकलेला नाही. तसंच एफडीएने अद्याप या संसर्गामुळे कोणीही आजारी पडल्याची किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
रोग नियंत्रण केंद्राच्या मते, साल्मोनेला जीवाणू सामान्य लोकांना आजारी पाडू शकतात. अन्नातून होणाऱ्या आजारांचं हे सर्वात प्रमुख कारण आहे. साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे ताप, अतिसार, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू शकतात. लहान मुले आणि वृद्धांच्या रोगप्रतिकारक शक्तीला देखील हानी पोहोचवू शकतात.
लघवी करताना सतत होणारी जळजळ असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष न करता आरोग्याची घ्या काळजी
अमेरिका जगातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादक देशांपैकी एक आहे. येथील २० हून अधिक राज्यांमध्ये टोमॅटोचं मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतलं जातं. सर्वाधिक उत्पादन फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया राज्यांमध्ये होते. २०२३ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत २.५ लाख एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. एकरी सरासरी ५० टन उत्पादन रोतं. अशा परिस्थितीत, २०२३ मध्ये अमेरिकेत ७१.५६ कोटी डॉलर्स (सुमारे ६,१५० कोटी रुपये) किमतीचे टोमॅटोचे उत्पादन झालं होतं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा हा व्यवसाय धोक्यात आला आहे.