Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siddaramaiah Resigns: ‘हायकमांडने सांगितल्याप्रमाणे मी केलं’; राजीनाम्यानंतर भावूक होत सिद्धरामय्यांनी मानले सोनिया-राहुल गांधींचे

Siddaramaiah Resignation: सिद्धारामय्या यांनी २००६ मध्ये पक्षात प्रवेश केल्यापासून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांचे आभार मानले.

  • By anuradha sagar
Updated On: May 28, 2026 | 04:36 PM
मोठी बातमी ! पक्षाचा आदेश मानून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

मोठी बातमी ! पक्षाचा आदेश मानून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

Follow Us
Follow Us:
  • सिद्धारामय्या यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे
  • हायकमांडने सांगितल्याप्रमाणे मी केले- सिद्धारामय्या
  • राजीनाम्यानंतर भावूक होत सिद्धरामय्यांनी मानले सोनिया-राहुल गांधींचे आभार
 

Siddaramaiah Resignation: “मला कर्नाटकातील सात कोटी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेते होण्याची संधी मिळाली. यासाठी मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा ऋणी आहे.”अशा शब्दांत काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

खरंतर कर्नाटकचे राजकारणात एका नव्या वळणावर आले आहे. सिद्धारामय्या यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम लागला. राजीनामा दिल्यानंतर सिद्धारामय्या यांनी त्यांच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.

Siddaramaiah resignation: अखेर सिद्धारामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “हायकमांडने सांगितल्याप्रमाणे मी केले. पक्षाच्या नेतृत्वाने सुरुवातीपासूनच मला राजीनामा देण्यास सांगितले होते. राज्यपाल परतल्यानंतर संविधानानुसार माझा राजीनामा स्वीकारला जाईल, याची मला खात्री आहे. संविधान सर्वोच्च आहे आणि आम्ही नेहमी घटनात्मक मूल्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. लोकांनी आम्हाला निष्ठावान अनुयायी म्हणून स्वीकारले आणि समर्थक कायम आमच्या पाठीशी उभे राहिले.”

यावेळी बोलताना सिद्धारामय्या यांनी २००६ मध्ये पक्षात प्रवेश केल्यापासून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांचे आभार मानले.

विरोधकांवरही साधला निशाणा

आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सिद्धरामय्या यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या हमी योजनांमुळे राज्याचा खजिना रिकामा होईल, अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, काँग्रेसच्या योजनांबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

Karnataka Politics: कर्नाटकात सत्ताबदलाचे वारे; सिद्धारामय्या देणार राजीनामा, कोण होणार नवा मुख्यमंत्री?

सिद्धारामय्या म्हणाले, “मी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, हायकमांडचा आदेश मिळताच मी राजीनामा देईन. आज मी तो निर्णय घेतला असून पुढील मुख्यमंत्र्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे,”तसेच, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत १३५+१ जागांवर विजय मिळवला असून दोन अपक्ष आमदारांनीही सरकारला पाठिंबा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.

डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या अंतिम निर्णयावर चर्चा सुरू असताना, रोटेशन करारानुसार डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचे की दुसऱ्या कोणाचा विचार करायचा, हे ठरवले जात होते, तेव्हा प्रियांका गांधी वद्रा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि नेतृत्वाला केवळ डी. के. शिवकुमार यांचीच निवड करण्याचा, इतर कोणाचीही नाही, असा सल्ला दिला होता.

 

Web Title: Siddaramaiah steps down as karnataka chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Congress Politics
  • Karnataka Chief Minister Siddaramaiah
  • Karnataka Politics

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Book Dispute: सोनिया गांधींचे पुस्तक छापण्यास प्रकाशकांवर कोणाचा दबाव: RSS आणि मोदींशी काय आहे संबंध?
1

Sonia Gandhi Book Dispute: सोनिया गांधींचे पुस्तक छापण्यास प्रकाशकांवर कोणाचा दबाव: RSS आणि मोदींशी काय आहे संबंध?

Congress Internal Conflict:राहुल गांधींच्या मेहनतीवर ‘घरभेद्यां’चा सुरुंग! अंतर्गत गटबाजीने काँग्रेस संकटात
2

Congress Internal Conflict:राहुल गांधींच्या मेहनतीवर ‘घरभेद्यां’चा सुरुंग! अंतर्गत गटबाजीने काँग्रेस संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.