Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क स्मृती इराणींकडूनच राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक; कारणही आहे तसंच…

राष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक मोठे बदल होताना दिसत आहे. कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस नवीन उभारी घेतो आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे आता लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांची लोकप्रियता तरुणांना भावते आहे. यावर आता भाजप नेत्या आणि राहुल गांधी यांच्या कट्टर विरोधी स्मृती ईराणी यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 29, 2024 | 12:26 PM
Smriti Iranis praises Rahul Gandhi

Smriti Iranis praises Rahul Gandhi

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राजकारणामध्ये शत्रूता आणि मित्रता जास्त काळ टिकत नाही असे म्हणतात. राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कट्टर विरोधक म्हणून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे आज एकमेकांची स्मुती करताना दिसत आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप नेत्या स्मृती ईराणी यांची चर्चा रंगली आहे. एकेकाळी जहरी टीका करणाऱ्या स्मृती ईराणी यांनी कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एका पॉडकास्टमधील स्मृती ईराणी यांची व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

स्मृती ईराणींकड़ून स्मृतीसुमने

एका पॉडकास्टमध्ये स्मृती ईराणी सहभागी झाल्या होत्या. यावेळी वेगवेगळ्या राजकीय विषयांवर त्यांनी भाष्य केले. स्मृती ईराणी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या राहुल गांधी यांच्याबाबत विचारण्यात आले. यावेळी स्मृती ईराणी यांनी दिलेल्या उत्तरावरुन सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्या पॉडकास्टमध्ये म्हणाल्या, “राहुल गांधींच्या राजकारणात चांगला बदल झाला आहे. ते आता चांगले आणि यशस्वी होत आहेत असे वाटते. जातीबद्दल बोलायचे झाले तर इतक्या वर्षांच्या राजकारणात ते प्रथमच वादावर बोलत आहेत. ते एका वेगळ्या पद्धतीचे राजकारण करत आहे. तुम्ही त्याची कृती योग्य, अयोग्य किंवा बालिश म्हणू शकता. पण ते वेगळ्या पद्धतीचे राजकारण करत आहे, अशा शब्दांत स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांचे राजकारण बदलेले असून त्यांच्यामध्ये चांगला बदल झाल्याचे देखील ईराणी यांनी कबूल केले आहे.

RaGa Need New Haters,
Old one became his fans!!@smritiirani @RahulGandhi pic.twitter.com/UnccPUWGKO

— Newton (@newt0nlaws) August 28, 2024

पांढऱ्या टी शर्टचे कौतुक

त्याचबरोबर भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी यांच्या लूकमध्ये देखील बदल झाला आहे. यामुळे त्यांच्या चेहरा तरुणासाठी आश्वासक बनला आहे. भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी हे फक्त पांढऱ्याच कपड्यांमध्ये दिसत आहे. पांढरा टी- शर्ट परिधान केलेले राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. याचे कौतुक करताना स्मृती ईराणी म्हणाल्या की,  ते आता संसदेत पांढरा टी-शर्ट घालून येतात. त्यांना पांढरा टी-शर्टच्या माध्यमातून तरुण पिढीला काय संदेश द्यायचा आहे, हे त्यांना माहीत आहे. ते वेगळ्या पातळीवरचे राजकारण करत आहेत, गैरसमजात राहू नये, असे स्मृती ईराणी म्हणाल्या आहेत.

हे देखील वाचा – चंपाई सोरेन भाजपच्या गळाला! झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा, 30 ऑगस्टला ‘भाजप’ प्रवेश

राहुल गांधी यांच्याकडून बचाव

स्मृती ईराणी आणि राहुल गांधी यांच्यामधील राजकीय वाद कमी होत आहे. ईराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ही राजकीय दुष्मनी सुरु झाली होती. आता मात्र दोन्ही नेत्यांमधील राजकीय वादंग शांत झाला. आता राहुल गांधी स्मृती इराणींच्या बचावासाठी पुढे आले. राहुल गांधी यांनी एक्सवर स्मृती ईराणी यांच्याबाबत बचावात्मक टीप्पणी केली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “आयुष्यात विजय आणि पराभव आहेत. “मी सर्वांना विनंती करतो की, स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याशी अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणे टाळावे.” असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

 

Winning and losing happen in life.

I urge everyone to refrain from using derogatory language and being nasty towards Smt. Smriti Irani or any other leader for that matter.

Humiliating and insulting people is a sign of weakness, not strength.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 12, 2024

Web Title: Smriti iranis praises rahul gandhi for his changing politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Rahul Gandhi
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
3

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.