
Strategist Prashant Kishor to retire politics after not wining single seat in Bihar assembly elections
Bihar Elections 2025: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली. यामध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडीला घवघवीत यश मिळाले. तर विरोधकांचा अक्षऱशः सुपडा साफ झाला. एनडीएकडून तब्बल 202 जागा मिळवून तीन आकडी विजय मिळवला. राष्ट्रीय जनता दलाला 25 आणि कॉंग्रेसला केवळ सहा जागा मिळवता आल्या. मात्र राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची स्ट्रेटेजी फोल ठरली. बिहारच्या जनतेला नवा पर्याय देऊ पर्याय येऊ पाहणारे प्रशांत किशोर यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. बिहारच्या जनतेने अजिबात साथ न दिल्यानंतर जनसुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर त्यांची त्यांच्या पक्षातील नेत्याने भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनसुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांनी आश्वासनांच्या अक्षरशः पाऊस पाडला होता. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका करत बिहारच्या जनतेला नवा पर्याय देण्याचा विचार केला. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष २५ पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. तसं झाल्यास मी राजकारण सोडून देईन. मात्र, संयुक्त जनता दलाने तब्बल ८५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवरून प्रशांत किशोर यांच्या राजकीय संन्यासाच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता जनसुराज पार्टीच राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उदय सिंह म्हणाले, “अजिबात नाही, प्रशांत किशोर राजकारण सोडणार नाहीत. उलट काही लोकांना वाटतंय की त्यांनी राजकारण सोडावं. प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तीचा आणि जन सुराज पार्टीचा अंत व्हावा असं तुम्हाला (प्रसारमाध्यमं व सत्ताधारी) वाटत असेल. तसं झाल्यास तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही यावर जोर का देताय? त्यानी राजकारण का सोडावं? हे सगळे खूप आश्वर्यजनक आहे.
प्रशांत किशोर यांनी याआधी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी अंदाज व्यक्त केला होता की, जदयू सहापेक्षा कमी जागांवर विजयी होईल, परंतु, जदयूने १२ जागा जिंकून प्रशांत किशोर यांच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली होती. तज्ज्ञांच्या मतानुसार तेव्हापासून बिहारमधील राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपा व जदयूने राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी जोर लावला. त्यात त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळाली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
बिहारमधील समीकरणे
राजकीय समीकरण पहाताच, एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू हे दोन्ही प्रभावी पक्ष असून, त्यांचे मतांचे प्रमाण जवळपास सारखे आहे. भाजपला २०.०८%, जेडीयूला १९.२५% तर एलजेपी आरव्हीला ४.९७% मते मिळाली. महागठबंधनात आरजेडी हा एकमेव मोठा मतांचा पक्ष आहे. काँग्रेसला केवळ ८.७१% आणि सीपीआय (एमएल) (एल) ला २.८४% मते मिळाली. महागठबंधनातील “टॉप-३” पक्षांचा एकत्रित मतांचा वाटा फक्त ३५% आहे, तर एनडीएमधील तीन सर्वात मोठ्या पक्षांचा एकत्रित मतांचा वाटा तब्बल ४५% आहे. यावरून एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील मतांच्या ताकदीतील मोठा फरक स्पष्टपणे दिसून येतो.