Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच हे ‘अंतिम सत्य’ असल्याचे स्टेट्स ठेवत दोन मित्रांची आत्महत्या; कारण आलं समोर…

बालेंद्र पाल आणि अमन वर्मा अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचे प्रवचन ऐकले होते. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2024 | 01:18 PM
Suicide News

Suicide News

Follow Us
Follow Us:

लखनौ : मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, असं स्टेट्स (Status on WhatsApp) ठेवत दोन मित्रांनी आत्महत्या केली. या दोन मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी ओशो यांचे प्रवचन ऐकल्याची माहिती दिली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन येथे घडली.

बालेंद्र पाल आणि अमन वर्मा अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचे प्रवचन ऐकले होते. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला. बालेंद्रचा मृत्यू जागीच झाला. तर अमनची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्याने त्याच्या घरातील लोकांना फोन केला होता आणि विषारी पदार्थ खाल्ल्याची माहिती दिली.

दरम्यान, ही माहिती मिळताच अमनच्या घरातल्यांनी अमन आणि बालेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, बालेंद्रचा मृत्यू घरीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अमनवर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीदरम्यान हे समजलं आहे की, अमन आणि बालेंद्र या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि त्याचे लग्नही झाले होते. पण बालेंद्रचं लग्न झालेले नव्हते. बालेंद्र अमनला भेटायला येत असे. हे दोघेही ओशोंची प्रवचनं ऐकत असत. ओशोंच्या विचारांचा या दोघांवर खूप प्रभाव होता.

स्टेट्स ठेऊन आत्महत्या

मृत्यू हेच सत्य आहे असं स्टेट्स दोघांनीही ठेवले होते. तसेच जळणारी चिता, प्रेतयात्रा असे एकूण तीन फोटो त्यांनी स्टेटसला ठेवले होते. त्यामुळे या दोघांनी ओशोंचे प्रवचन ऐकूनच आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Web Title: Suicide of two friends stating that death is the ultimate truth nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • suicide news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.