Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

भाऊबीजेच्या दिवशी सिन्नर येथील प्रसिद्ध होलसेल फटाके व्यापारी अतुल रामदास बोऱ्हाडे (३४) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 02:35 PM
अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • सावकारीच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या
  • अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण
  •  पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल
सिन्नर : भाऊबीजेच्या दिवशी सिन्नर येथील प्रसिद्ध होलसेल फटाके व्यापारी अतुल रामदास बोऱ्हाडे (वय ३४) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, आर्थिक व्यवहारातून होणारा कथित मानसिक छळ आणि पैशांच्या वसुलीसाठी होणाऱ्या तगाद्याला कंटाळून अतुल यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी नलिनी गिते वगळता सात जणांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. या प्रकरणामुळे सिन्नर शहरातील खाजगी सावकारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

अतुल बोऱ्हाडे यांच्या पत्नी प्रियंका बोऱ्हाडे (वय २९, रा. रामनगरी, सिन्नर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अतुल यांनी संबंधित आठ जणांकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. घेतलेल्या रकमेची परतफेडही त्यांनी केली होती. मात्र, संबंधितांकडून ‘आम्हाला फक्त व्याजाची रक्कम मिळाली असून मुद्दल अद्याप बाकी आहे,’ असे सांगत पैशांसाठी वारंवार तगादा लावला जात होता. प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच मेसेज करून अतुल यांना त्रास दिला जात होता. काही जण त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे अतुल मानसिक तणावाखाली होते. संबंधितांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ

लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा 

सचिन संभाजी गीते, नलिनी सचिन गीते, हर्षल गोळेसर, सचिन धनगर, सौरभ खेडलेकर, मीरा खोपे, उज्ज्वला लोखंडे आणि माधुरी सागर शिंदे (सर्व रा. सिन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी नलिनी गीते वगळता उर्वरित सात जणांना पोलिसांनी तब्येत घेतले आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल बोऱ्हाडे यांचा होलसेल फटाके विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी संबंधित व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतल्याची सिन्नरमध्ये चर्चा आहे. मुद्दल आणि व्याज मिळून हा आर्थिक व्यवहार जवळपास ५० लाख रुपयांच्या घरात असल्याचेही बोलले जात आहे. घेतलेल्या रकमेची वेळेत परतफेड करता न आल्याने तसेच पैसे देणाऱ्यांकडून वारंवार तगादा सुरू असल्याने अतुल तणावाखाली होते, अशी चर्चा शहरात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिन्नर येथील आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: अतुल रामदास बोऱ्हाडे (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सिन्नरमधील प्रसिद्ध होलसेल फटाके व्यापारी होते.

  • Que: अतुल बोऱ्हाडे यांच्या आत्महत्येमागे कोणते कारण असल्याचा आरोप पत्नीने केला आहे?

    Ans: आर्थिक व्यवहारातून होणारा कथित मानसिक छळ, पैशांच्या वसुलीसाठी वारंवार होणारा तगादा, शिवीगाळ आणि धमक्यांमुळे अतुल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रियंका बोऱ्हाडे यांनी केला आहे.

  • Que: या प्रकरणात किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नलिनी गिते यांना वगळता सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The police have taken major action in the atul borhade suicide case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ
1

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
2

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
3

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
4

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.