Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना जुने नाशिकमधील मुल्तानपुरा भागात उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 01:01 PM
टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये धक्कादायक घटना
  • विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
  • सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
नाशिक : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना जुने नाशिकमधील मुल्तानपुरा भागात उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व तीव्र संताप व्यक्त होत असून, मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह दोन दीर आणि जेठाणी अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीना सिराज्जोद्दीन शेख (वय २८, रा. घर क्र. ८०९/२६९९, मुल्तानपुरा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सन २०२१ पासून ते शनिवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजेपर्यंत जरीना यांना सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिला जात होता. संशयित पती सिराज्जोद्दीन अलीमोद्दीन शेख, मोठा दीर फजलुद्दीन अलीमोद्दीन शेख, दीर सरफोद्दीन अलीमोद्दीन शेख आणि जेठाणी रेहाना फजलुद्दीन शेख हे जरीना यांना घरगुती कारणांवरून वेळोवेळी टोमणे मारत होते. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत हाताचापटीने मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

हे सुद्धा वाचा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

या सततच्या जाचाला व अपमानाला कंटाळून अखेर जरीना यांनी शनिवारी (दि. १४) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच मयत जरीना यांचा भाऊ अब्रार मन्नान सय्यद (वय ३०, व्यवसाय किराणा दुकान, रा. मंठा, जि. जालना) यांनी तातडीने नाशिक गाठत भद्रकाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक कलहामुळे एका निष्पाप विवाहितेला प्राण गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक सविता सदावर्ते करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाशिकमध्ये आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: जरीना सिराज्जोद्दीन शेख (वय २८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्या मुल्तानपुरा, जुने नाशिक परिसरात राहत होत्या.

  • Que: जरीना शेख यांनी आत्महत्या का केली?

    Ans: पोलिसांच्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींकडून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली जात असल्याने त्या त्रस्त होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: मयत जरीना यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती सिराज्जोद्दीन शेख, दोन दीर फजलुद्दीन शेख व सरफोद्दीन शेख आणि जेठाणी रेहाना शेख अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A married woman has died by suicide driven to it by harassment from her in laws nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले
1

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
2

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात
3

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
4

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.