Accept 11 documents including Aadhaar card for SIR...; Supreme Court orders the Commission
एक रशियन महिला आणि भारतीय पतीच्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण सुर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ४ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात घेण्यावरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने (SC) आता मोठा आदेश दिला आहे. न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि गृह मंत्रालय (MHA) यांना मुलाला घेऊन फरार झालेल्या रशियन महिलेविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी
भारतीय वडील आणि रशियन आईच्या नात्यातून हे मूल जन्माला आले होते, परंतु दोघांमधील वादानंतर रशियन महिला घेऊन रशिया गेली. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिस आयुक्त आणि डिफेन्स कॉलनी पोलिस स्टेशनचे एसएचओ यांना कोणताही विलंब न करता मुलाचा शोध घेण्याचे आणि त्याचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने रशियन महिलेचा पासपोर्ट जप्त करण्याचे निर्देश देखील दिले आहेत आणि विमानतळ आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना देशातील सर्व विमानतळांवर तिच्या प्रवेश आणि निर्गमनावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ताब्यात घेऊन परदेशात पळून जाण्यासारख्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
व्हिक्टोरिया नावाच्या एका रशियन महिलेने २०१७ मध्ये भारतातील अभियंता सैकत बसूशी लग्न केले. २०२० मध्ये दोघांनाही एक मुलगा झाला. पण दोघांचेही वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. दोघांच्या विभक्त झाल्यानंतर व्हिक्टोरियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आठवड्यातून तीन दिवस मुलाला तिच्यासोबत ठेवण्याची न्यायालयाकडून परवानगी मिळवली.
पण न्यायालयाची ही सूट मोठ्या फसवणुकीची सुरुवात ठरली. असा आरोप आहे की व्हिक्टोरिया तिच्या ४ वर्षांच्या मुलासह रशियन दूतावासातील अधिकाऱ्याच्या मदतीने फरार झाली. सैकत बसू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सांगितले की व्हिक्टोरियाला शेवटचे ७ जुलै रोजी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये तिचे सर्व सामान घेऊन रशियन दूतावासात जाताना दिसले होते.
१० जुलै रोजी जेव्हा सैकत मुलाला घेण्यासाठी आला तेव्हा तो बेपत्ता होता. आता असा संशय आहे की व्हिक्टोरिया मुलाला बेकायदेशीरपणे रशियाला घेऊन गेली आहे. सैकतने न्यायालयाला सांगितले की लग्नानंतर त्याला कळले की व्हिक्टोरियाचे वडील रशियन गुप्तचर संस्थेत उच्च पदावर होते. या गंभीर प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.