
Surya kant 53th Chief Justice of India Swearing Ceremony at Rashtrapati Bhavan with President Draupadi Murmu
देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सूर्य कांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
LIVE: Swearing-in-Ceremony of the Chief Justice of India Shri Justice Surya Kant at Rashtrapati Bhavan https://t.co/EZGbzgCbig — President of India (@rashtrapatibhvn) November 24, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रसायने आणि खते मंत्री जे पी नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, नेते आणि माजी न्यायाधीश देखील उपस्थित होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आणखी एका कारणाने लक्षवेधी ठरला आहे. पहिल्यांदाच न्यायमूर्तीच्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर सात देशांचे न्यायमूर्ती उपस्थित होते. यामध्ये भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संधीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील. तब्बल १५ महिने त्यांच्याकडे हे पद असेल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत ?
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांनी हिसार येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले.
Ans: भूषण गवई यांनी निवृत्ती घेतल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहे.
Ans: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.