Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengal Violence : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्यात

परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 07:46 AM
Bengal Violence : सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्यात

Bengal Violence : सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्यात

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यानंतर आता तेथील राजकारण तापले आहे. त्यातच परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यानंतर दोहरिया परिसरात गोळीबार केला. स्थानिक सूत्रांनुसार, चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या डोक्यात लागल्या.

चंद्रनाथ रथ हे एका कामानिमित्त कारने जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चंद्रनाथ यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांचा बराच वेळ पाठलाग केला. त्यांची गाडी हळू होताच त्यांनी गोळीबार सुरू केला.

गोळीबाराचा व्हिडिओ होतोय व्हायरल

या गोळीबाराचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात गोळ्या लागून गाडीच्या पुढील आणि बाजूच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, या हत्येनंतर पोलीस आणि केंद्रीय दलांनी परिसराला घेराव घातला आहे. हत्येची बातमी पसरल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थक वैद्यकीय केंद्राबाहेर जमले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त करत आहेत.

निवडणुकीत केली होती मोठी मदत

भाजपच्या सूत्रांनुसार, भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी काम करणाऱ्या टीममधील चंद्रनाथ हे प्रमुख सदस्यांपैकी एक होते. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले बुद्धदेव बेरा हे त्या पथकाचा भाग असल्याचे सांगितले जात असून, ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

हिंसाचाराची 200 प्रकरणांची नोंद

निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड आणि हल्ल्याशी संबंधित जवळपास २०० गुन्हे दाखल केले असून ४३३ जणांना अटक केली आहे. ११०० हून अधिक लोकांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आहे.

West Bengal Election : आसनसोलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या; राहुल गांधींची आक्रमक भूमिका, म्हणाले, “बंगालमध्ये गुंडराज…

Web Title: Suvendu adhikaris pa shot dead incident in pargana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 07:29 AM

Topics:  

  • West bengal

संबंधित बातम्या

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त
1

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त

West Bengal Violence:  हावड्यात भीषण बॉम्बस्फोट आणि विटाफेक; भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले
2

West Bengal Violence: हावड्यात भीषण बॉम्बस्फोट आणि विटाफेक; भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले

Vande Mataram : राष्ट्रीय गीताचा मान होणार अधिक दृढ! ‘वंदे मातरम’लाही आणले ‘या’ कायद्याच्या कक्षेत
3

Vande Mataram : राष्ट्रीय गीताचा मान होणार अधिक दृढ! ‘वंदे मातरम’लाही आणले ‘या’ कायद्याच्या कक्षेत

Who is Next CM of West Bengal;  भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ५ दिग्गज शर्यतीत !
4

Who is Next CM of West Bengal; भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ५ दिग्गज शर्यतीत !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.