Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी”, चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या एक दिवस आधी, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2024 | 06:38 PM
“अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी”, चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

एन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमरावतीच्या थांबवलेल्या विकासाला चालना मिळाली आहे. विभाजनाच्या 10 वर्षानंतर देखील राजधानीचे भवितव्य आणि भौगोलिक स्थान कायम होते. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 1 मार्च 2014 नुसार 2 जून 2024 पासून हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल. यावेळी एनडीएच्या बैठकीत एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी… असं यावेळी म्हणाले.

अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल. टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला नायडू संबोधित करत होते. बैठकीत त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावती आहे. राज्याच्या विभाजनानंतर अमरावती ही राजधानी आहे. 2014 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री होते. नायडू यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची कल्पना मांडली होती.

2019 मध्ये त्यांची सत्ता गमावल्याने नायडू यांच्या कल्पनेला धक्का बसला आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर रेड्डी यांनी अमरावती शहराच्या योजना रद्द केल्या आणि तीन राजधान्यांची नवीन कल्पना मांडली, ज्याची जागा आता एकच राजधानी ठेवण्याच्या निर्णयाने नायडूंनी घेतली आहे.

आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपी, भाजप आणि जनसेना यांच्या युतीचा एकतर्फी विजय झाला. विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला 164 जागा मिळाल्या. तर लोकसभा निवडणुकीत 21 जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवला. या आदेशामुळे अमरावतीला राजधानी बनवण्याच्या योजनेत नवसंजीवनी मिळाली आहे.

Web Title: Tdp chief n chandrababu naidu dream amravati project revived will cost rs 40000 cr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Chandrababu Naidu

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे
1

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण
2

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित, टीटीडीने दिले कारण

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या
3

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल, दरमहा कमावले कोट्यवधी रुपये; कसं ते जाणून घ्या

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video
4

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.