Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP New State President : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

तेलंगणामध्ये भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्याप जाहीर झालेले नसताना पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. गोशामहलचे आमदार आणि राज्यातील भाजपचा मोठा चेहरा असलेले टी. राजा सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 30, 2025 | 07:53 PM
भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

Follow Us
Close
Follow Us:

तेलंगणामध्ये भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्याप जाहीर झालेले नसताना पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. गोशामहलचे आमदार आणि राज्यातील भाजपचा मोठा चेहरा असलेले टी. राजा सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगी न दिल्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. हायकमांडकडून रामचंद्र राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

BJP New President : भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू; उद्या सांयकाळपर्यंत या नावावर शिक्कामोर्तब

राज्यातील जातीय समीकरणं राखण्यात मोठं योगदान असल्यामुळे रामचंद्र राव यांना अध्यक्ष बनवण्यामागील एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. राव तेलंगणामधील ब्राह्मण समुदायातून येतात आणि त्यांना संघटना मजबूत करण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत विचारमंथन सुरू असताना आणि भाजप तेलंगणामध्ये संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

टी राजा सिंह लोकप्रिय नेते

टी राजा सिंह तेलंगणामधील लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी हिंदुत्वासोबतच राष्ट्रवादी विचारसरणीचा उघडपणे प्रचार करत राज्याच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केले. राज्यात काँग्रेसच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही ते निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना भाजपशी जोडण्यासाठी ते सतत रॅली, बैठका आणि कार्यक्रम घेत होते. तरीही त्यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून लांब ठेवण्यात आलं.

दरम्यान तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी, आपण मोठ्या निराशेने पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचं म्हटलं आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या अधिकृत ओळखपत्रावरून ‘अशोकस्तंभ’ गायब, संविधानिक प्रतीकांशी छेडछाड केल्याचा विरोधकांचा आरोप

टी राजा सिंह यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय की, ‘मीडिया रिपोर्ट्सनुसार रामचंद्र राव तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असू शकतात. हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक आहे. माझ्यासोबत खंबीरपणे उभे असलेल्या लाखो कार्यकर्त्यांसाठीही हा एक अतिशय दुःखद निर्णय आहे. कार्यकर्त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले टी राजा सिंह यांनी २०१८ मध्ये गोरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता, हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करण्यासाठी काम करत राहीन असं त्यांनी त्यावेळी पत्रात म्हटलं होतं. मात्र पक्षाने त्यावेळी त्याचा राजीनामा स्वीकारला नव्हता. आता भाजप त्यांची मनधरणी करणार की टी राजा कोणता मोठा निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Telangana bjp mla t raja singh resigns from party amid state president election latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • BJP Politics
  • BJP President Election
  • Telangana

संबंधित बातम्या

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
1

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार केली शंभरी; परंपरा…संघटना..समाजकार्यामध्ये ठरली एक नंबरी
3

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार केली शंभरी; परंपरा…संघटना..समाजकार्यामध्ये ठरली एक नंबरी

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?
4

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.