Telangana Blast: तेलंगणा ब्लास्ट घटनेत आतापर्यंत 39 मृत्यू; तर ढिगाऱ्याखाली अजूनही...
Telangana Blast: काल तेलंगणा राज्यात एक मोठी दुर्घटना घडली होती. तेलंगणा राज्यातील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला होता. हा भीषण स्फोट काल झाला होता. कालपासून सुरू झालेले बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण करखानाच उद्ध्वस्त झाला आहे. या दुर्दैवी घटनेत आता समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 39 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
संगारेड्डी जिल्ह्यात एक फार्मा कंपनी आहे. तिथे काल मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले होते. सुरुवातीच्या माहितीनुसार 2 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता या घटनेत तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे जखमी आणि मृत कामगारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
24 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
तेलंगणा राज्यात सोमवारी सकाळच्या सुमारास एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर कंपनीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. घटना घडतच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 24 तासांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
स्फोट झाल्यानंतर कंपनीत मोठी आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या. स्फोटातील आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 11 गाड्या दाखल झाल्या होत्या. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक पोलिस अनुई अन्य यंत्रणा उपस्थित आहे. बचावकार्य मोठ्या वर्गाने सुरू आहे. औषधांच्या कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे अनेक कामगार जखमी झाले. तर स्फोटामुळे उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडले.
Telangana Blast: मोठी बातमी! तेलंगणामध्ये फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार तर 14 जखमी
घटनेची चौकशी होणार
अतरासी गावात असणाऱ्या कारखान्यात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. यात 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 6 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. 12 पेक्षा अधिक कामगार ढीगऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान हा कारखाना अवैधरित्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ही घटना कशामुळे घडली आणि त्यामागचे कारण काय याचा तपास केला जाणार आहे.
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.