तेलंगणामध्ये भीषण स्फोट (फोटो- सोशल मीडिया)
तेलंगणा: तेलंगणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. संगारेड्डी जिल्ह्यात एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. औषध निर्मितीच्या कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगारेड्डी जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत स्फोट झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात १४ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणी अनेक कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे.
स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिस आणि अन्य बच्चाव यंत्रणा दाखल झाल्या आहेत. बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलेले आहे. जखमी कामगारांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्या घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
औषधांच्या कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे अनेक कामगार जखमी झाले. तर स्फोटामुळे उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडले. या कारखान्यात औषधांची पावडर तयार करण्याचे काम केले जात असे. या भीषण स्फोटात पूर्ण इमारत उध्वस्त झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. स्फोट झाला तेव्हा १०० पेक्षा अधिक कामगार कारखान्यात काम करत होते. यामध्ये काही कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी हैदराबादला हलविण्यात आले आहे.
फटाक्यांच्या अवैध कारखान्यात भीषण स्फोट
उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. अमरोहा जिल्ह्यातील अतरासी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या गावात अवैधरीत्या फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. काम सुरू असताना अचानक या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.
Firecracker Factory Blast: मोठी बातमी! फटाक्यांच्या अवैध कारखान्यात भीषण स्फोट; 6 कामगार ठार
घटनेची चौकशी होणार
अतरासी गावात असणाऱ्या कारखान्यात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. यात 6 मंजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 6 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. 12 पेक्षा अधिक कामगार ढीगऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान हा कारखाना अवैधरित्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ही घटना कशामुळे घडली आणि त्यामागचे कारण काय याचा तपास केला जाणार आहे.
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.