Indian Army: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मूच्या राजौरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. राजौरी येथील सुंदरबन परिसरातील भागात दहशतवाद्यांनी घात लावून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याची घटना घडली. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या भागात अतिरिक्त सैन्यदल पाठवण्यात आले आहे. परिसराला वेढा घातला असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
Rajouri, J&K | Firing on an Army vehicle from some distance in the Sunderbani Sector. Army on high alert. Details being ascertained: Army Officials
— ANI (@ANI) February 26, 2025
दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे, परिसरात मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला आहे. 7 फेब्रुवारीच्या दिवशी देखील भारतीय लष्कराने 7 पाकिस्तानच्या घुसखोरांना ठार मारले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता
शेजारील राष्ट्र पाकिस्तान कायमच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र भारतीय लष्कर अशा नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत असते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याच दरम्यान काही महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या आखनूर सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार हे सर्च ऑपरेशन केले जात आहे.
नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जोगीवन वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे भट्टल परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या शोध मोहीम राबवत आहे. या भागात काही दहशतवादी घुसल्याचा संशय भारतीय लष्कराला आहे.
Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता; नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून सर्च ऑपरेशन
शोधमोहीम अधिक वेगाने सुरू
भारतीय लष्कर या भागात अत्यंत वेगाने आणि सावधगिरीने शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे या परीसरासह संवेनदशील भागात भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्यातरी कोणतीही संशयास्पद कृती लष्कराला आढळून आलेली नाही. मात्र सतर्कता पूर्ण बाळगली जात आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मागील वर्षी याच परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवादी ठार केले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ तासात ३ दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आलं आहे. एकीकडे सुरक्षादलांसोबत सोपोरमध्ये एका दहशतवादीला ठार करण्यात आलं असतानाच, किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर ४ जवान जखमी झाले आहेत. सुरक्षादलांना अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.