Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्र प्रदेशला मिळाली नवी राजधानी; आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

लोकसभेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केले. या विधेयकानुसार अमरावतीला राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 01, 2026 | 04:04 PM
The Andhra Pradesh Reorganization Amendment Bill 2026 passed in the Lok Sabha.

The Andhra Pradesh Reorganization Amendment Bill 2026 passed in the Lok Sabha.

Follow Us
Close
Follow Us:

AP Reorganization Amendment Bill : नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज बुधवारी (दि.01) आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केले. या विधेयकानुसार अमरावतीला राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे. हे विधेयक केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सादर केले होते. विधेयकावर तासभर चर्चा झाली, त्यानंतर ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. विधेयकाला बहुतांश पक्षांचा पाठिंबा मिळाला, परंतु वायएसआर काँग्रेस पक्षाने निषेध म्हणून सभात्याग केला.

अमरावतीला राजधानी बनवण्यासाठी आपली जमीन दान केलेल्या शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी या विधेयकात कोणतीही स्पष्ट कालमर्यादा निश्चित केलेली नाही, असा आरोप वायएसआर काँग्रेसने केला आहे.

वायएसआर काँग्रेसचा विधेयकाला विरोध
वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार पी. व्ही. मिथुन रेड्डी यांनी विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली. प्रस्तावित बदलांचा राज्यावर होणाऱ्या परिणामाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे खासदार सी. एम. रमेश यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमरावतीला राजधानी बनवण्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका विरोधाभासी वाटते, असे ते म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये दंगलीचा भडका? भरदिवसा पुरातन मंदिर तोडण्याचा प्रयत्न

अमरावती राज्याची नवी राजधानी होणार

हे विधेयक आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, हे २०१४ च्या कलम ५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. मूळ कायद्यानुसार हैदराबादला १० वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु कायमस्वरूपी राजधानीबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती. नवीन सुधारणेनुसार अमरावतीला राज्याची कायमस्वरूपी आणि एकमेव राजधानी म्हणून घोषित केले जाईल, ज्यामुळे या विषयावर पूर्ण स्पष्टता येईल.

हे देखील वाचा : खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

१२ वर्षांची प्रतीक्षा संपली

जवळपास १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आंध्र प्रदेशला अखेर आपली कायमस्वरूपी राजधानी मिळाली आहे. अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांच्याही पाठिंब्याने सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले.

या विधेयकामुळे काय होणार?

आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ हे केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक प्रशासकीय, आर्थिक आणि संसाधन वाटपाशी संबंधित प्रश्न प्रलंबित राहिले होते. या पार्श्वभूमीवर २०२६ मधील सुधारणा विधेयकाद्वारे दोन्ही राज्यांमधील प्रलंबित मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः राजधानी विकास, महसूल वाटप, जलसंपत्ती आणि संस्थांचे विभाजन या विषयांवर नव्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या विधेयकामुळे आंध्र प्रदेशच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच दोन्ही राज्यांमध्ये समन्वय वाढवून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Web Title: The andhra pradesh reorganization amendment bill 2026 passed in the lok sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • amravati
  • Andhra Pradesh
  • Loksabha

संबंधित बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग! राज्यात १३ हजार सोनोग्राफी केंद्रांवर कडक तपासणी
1

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग! राज्यात १३ हजार सोनोग्राफी केंद्रांवर कडक तपासणी

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
2

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद
3

Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद

Amravati  News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप
4

Amravati News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.