Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court: कुटुंब संकल्पनाच लोप पावतेय: सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात समतोला देवी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी युक्तिवाद केला की हे घर त्यांच्या पतीची स्व-अर्जित संपत्ती होती आणि कृष्ण कुमार यांना त्यावर कोणताही हक्क नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 29, 2025 | 02:30 PM
'केवळ चिप प्रसिद्धीसाठी', प्रोटोकॉलवर दाखल याचिकेवर CJI भडकले, वकिलाला ठोठावला ७००० रुपयांचा दंड

'केवळ चिप प्रसिद्धीसाठी', प्रोटोकॉलवर दाखल याचिकेवर CJI भडकले, वकिलाला ठोठावला ७००० रुपयांचा दंड

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क:  भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो, मात्र आजच्या परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबातच एकता टिकवण्याचा संघर्ष करीत आहोत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठासमोर उत्तर प्रदेशातील ६८ वर्षीय समतोला देवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला, कृष्ण कुमारला, सुलतानपूरमधील  घरातून बेदखल करण्याची मागणी केली होती.

परिवार संकल्पना लोप पावत असल्याची चिंता

न्यायालयाने म्हटले की, ‘परिवार’ ही संकल्पना आता नामशेष होत चालली असून आपण ‘एक व्यक्ती, एक परिवार’ या स्थितीपर्यंत पोहोचत आहोत. “भारतात आपण ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर विश्वास ठेवतो, मात्र आता आपल्या जवळच्या कुटुंबातही एकता राखणे कठीण बनले आहे. संपूर्ण जग एकत्र आणण्याची संकल्पना तर आणखी अवघड आहे.”

लोकशाहीचा आवाज दडपला जातोय? राहुल गांधी सभागृहात का संतापले

कुटुंबातील वादाचा गुंता

समतोला देवी आणि त्यांचे दिवंगत पती कल्लू मल यांच्याकडे सुलतानपूरमध्ये तीन दुकाने असलेले घर होते. त्यांना तीन मुले आणि दोन मुली होत्या. परंतु, कृष्ण कुमारसोबतच्या वादांमुळे घरात तणाव वाढला. २०१४ मध्ये कल्लू मल यांनी कृष्ण कुमारवर दुर्व्यवहाराचा आरोप करत एसडीएमकडे कारवाईची मागणी केली होती. २०१७ मध्ये न्यायालयाने समतोला देवी आणि त्यांच्या पतीच्या भरण-पोषणासाठी दोन मुलांनी प्रत्येकी ८,००० रुपये देण्याचा आदेश दिला होता.

२०१९ मध्ये या दाम्पत्याने ‘माता-पिता व जेष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा’ अंतर्गत कृष्ण कुमारला घरातून बेदखल करण्यासाठी अर्ज केला. न्यायाधिकरणाने त्यांच्या परवानगीशिवाय घरात अतिक्रमण न करण्याचा आदेश दिला, मात्र त्याला बेदखल करण्यास नकार दिला. यावर अपील केल्यानंतर न्यायाधिकरणाने बेदखलीचा आदेश दिला, मात्र उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला.

Supreme Court News: ‘दारूचे व्यसन लपवल्यास विम्याचे पैसे मिळणार नाहीत’; सुप्रीम कोर्टाचा निकाल 

सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात समतोला देवी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी युक्तिवाद केला की हे घर त्यांच्या पतीची स्व-अर्जित संपत्ती होती आणि कृष्ण कुमार यांना त्यावर कोणताही हक्क नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत कृष्ण कुमारला घरातून बेदखल करण्यास नकार दिला.

न्यायालयाने नमूद केले की, “ज्येष्ठ नागरिक कायद्यात कोठेही अशा प्रकारच्या संपत्तीवरील बेदखलीची तरतूद नाही.” तसेच, जर ही संपत्ती कल्लू मल यांनी मुली व जावयाकडे हस्तांतरित केली असेल, तर त्यांच्या पत्नीला देखील कृष्ण कुमारला घराबाहेर काढण्याचा अधिकार राहात नाही.जर कृष्ण कुमारने आपल्या पालकांसोबत अपमानास्पद वर्तन केले असते किंवा त्यांच्या राहण्यास अडथळा निर्माण केला असता, तरच त्याला घरातून बाहेर काढता आले असते,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे कृष्ण कुमार यांच्या बेदखलीच्या अपीलला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. या प्रकरणात ज्येष्ठ वकील पल्लव शिशोदिया यांनी पालकांची बाजू मांडली होती.

 

Web Title: The concept of family is dying out supreme court expresses concern nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही
1

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार
2

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
3

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

विचार करा…! देशात सुप्रीम कोर्टच नसते तर? प्रत्येकाने संविधानाच्या आधाराने केली असती मनमानी
4

विचार करा…! देशात सुप्रीम कोर्टच नसते तर? प्रत्येकाने संविधानाच्या आधाराने केली असती मनमानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.