फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (SCI) कोर्ट प्रोग्रामर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 26 पदांवर भरती केली जाणार असून यात 6 वरिष्ठ कोर्ट सहाय्यक-कम-वरिष्ठ प्रोग्रामर आणि 20 कनिष्ठ कोर्ट सहाय्यक-कम-कनिष्ठ प्रोग्रामर पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 जून 2025 ते 27 जून 2025 रात्री 11:55 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर www.sci.gov.in अर्ज करावा.
वरिष्ठ कोर्ट सहाय्यक-कम-वरिष्ठ प्रोग्रामर पदासाठी एकूण ६ जागा रिक्त आहेत. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना लेव्हल ८ च्या माध्यमातून ₹47,600/- दरमाह वेतन मिळेल. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना काही निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचे शिक्षण B.E./B.Tech (कंप्युटर सायन्स/IT) किंवा MCA / M.Sc (CS) किंवा BCA / B.Sc (CS) 60% गुणांसह + 7 वर्षांचा अनुभव इतका आहे.
कनिष्ठ कोर्ट सहाय्यक-कम-कनिष्ठ प्रोग्रामर पदासाठी एकूण २० जागा रिक्त आहेत. या पदासाठी नियुक्त उमेदवारांना वेतन म्ह्णून दरमाह ₹35,400/- रक्कम दिली जाते. किमान १८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुळात, या पदासाठी एक ठराविक शिक्षण पूर्ण आवश्यक आहे. B.E./B.Tech (CS/IT) किंवा B.Sc (CS) / BCA उमेदवार अर्ज करतात.
निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे. लेखी परीक्षा, टेक्निकल अॅप्टिट्यूड टेस्ट (प्रात्यक्षिक) तसेच मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: